Akshay Kumar: छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अक्षय कुमार; शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले...
'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedant Marathe Veer Daudale Saat) या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका अक्षय कुमार (Akshay Kumar) हा साकारणार आहे. आता नुकताच अक्षयनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
Vedant Marathe Veer Daudale Saat: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedant Marathe Veer Daudale Saat) या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. अक्षयनं आज एक पोस्ट शेअर करुन चित्रपटाबाबत माहिती दिली. आता नुकताच अक्षयनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अक्षय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे.
अक्षयची पोस्ट
अक्षयनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये दिसत आहे. व्हिडीओला अक्षयनं कॅप्शन दिलं, 'जय भवानी, जय शिवाजी'. अक्षयनं शेअर केलेल्या व्हिडीओला काही नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. आतापर्यंत आठ हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
अनेक नेटकऱ्यांनी अक्षयनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट्स करुन त्याला ट्रोल केलं. एका नेटकऱ्यानं अक्षयनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट केली, 'रणवीर सिंहनं तुझ्यापेक्षा चांगलं काम केलं असतं.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'शरद केळकर छत्रपती शिवाजी महारजांची भूमिका चांगली साकारु शकतो.' 'हा लूक पर्फेक्ट वाटत नाही.' अशी कमेंट देखील एका नेटकऱ्यानं केली. तर काही नेटकऱ्यांनी कमेंट करुन अक्षयचं कौतुक देखील केलं आहे.
"वेडात मराठे वीर दौडले सात" या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे. या चित्रपटात अक्षयसोबतच अभिनेता प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्या मांजरेकर, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलगू भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Akshay Kumar: 'माँ जिजाऊंच्या आशीर्वादाने...'; अक्षय कुमारनं शेअर केली खास पोस्ट