एक्स्प्लोर

Bhagam Bhag 2 Announcement: अक्षय कुमार, परेश रावल आणि गोविंदा 20 वर्षांनी पुन्हा एकत्र, 'भागम भाग 2'ची घोषणा; 'हा' अभिनेताच करणार सिनेमाची निर्मिती

Bhagam Bhag 2 Announcement:'भागम भाग 2' ची घोषणा करण्यात आली असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला हा सिनेमा येणार आहे.

Bhagam Bhag 2 Announcement: अक्षय कुमार (Akshay Kumar), गोविंदा (Govinda) आणि परेश रावल (Paresh Rawal) यांच्या 'भागम भाग' (Bhagam Bhag 2) या सुपरहिट कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. त्यामुळे या त्रिकुटाला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. मात्र चाहत्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण 'भागम भाग 2' च्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. 

अक्षय कुमार, गोविंदा आणि परेश रावल 2006 मध्ये आलेल्या 'भागम भाग' या कॉमेडी चित्रपटाच्या दुसऱ्या भागात पुन्हा एकदा आपल्या दमदार विनोदाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार सज्ज झाले असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, 'भागम पार्ट 2' मूळ स्टारकास्टसहच पडद्यावर येणार आहे.  अक्षय कुमारने भागम भागचे हक्क शेमारूकडून विकत घेतले असून लवकरच तो 'भागम भाग 2' बनवणार आहे.                              

अक्षय कुमारने भागम भागचे हक्क विकत घेतले

रिपोर्ट्सनुसार, 'हेरा फेरी', 'भागम भाग' आणि 'गरम मसाला' हे अक्षय कुमारचे तीन सर्वात खास चित्रपट आहेत आणि त्याने 'हेरा फेरी' आणि 'भागम भाग'चे फ्रेंचायझी अधिकार आधीच निवडले आहेत. प्रियदर्शन दिग्दर्शित या कॉमिक चित्रपटाचे हक्क अक्षयने विकत घेतले आहेत आणि लेखकांच्या नवीन टीमसह सिक्वेल लिहिण्यास सुरुवात केली आहे.                                     

शूटिंग कधी सुरू होणार?

सर्व काही नियोजनानुसार पार पडले तर पुढच्या वर्षी 2025 मध्ये 'भागम भाग 2' चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल, असं म्हटलं जातंय. हा चित्रपट 2026 मध्ये थिएटरमध्ये दाखल होणार असल्याचीही चर्चा आहे.. वर्क फ्रंटवर अक्षय कुमार नुकताच सिंघम अगेनमध्ये दिसला होता. आता त्याच्याकडे 'हाऊसफुल 5', 'वेलकम टू द जंगल', 'स्काय फोर्स', 'भूत बांगला' आणि 'जॉली एलएलबी 3' असे सिनेमे पाइपलाइनमध्ये आहेत.                                               

ही बातमी वाचा : 

Orry : डोनाल्ड ट्रम्प यांना भारतातून केलं मतदान, ओरीच्या पोस्टमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का; नेटकरी म्हणाले, 'ओरीमुळेच ट्रम्प जिंकले'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
माजी आमदार निर्मला गावित यांना कारने उडवले, अपघाताची भीषण घटना; रुग्णालयात उपचार सुरू
माजी आमदार निर्मला गावित यांना कारने उडवले, अपघाताची भीषण घटना; रुग्णालयात उपचार सुरू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Gondia : तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर, गोंदिया करांचा कौल कुणाला?
Supreme Court On Election : स्था.स्व.संस्थांच्या निवडणुका अजूनही टांगणीलाच, कोर्टाची पुढील सुनावणी शुक्रवारी
Baramati Ganesh Market : कोटींची मंडई,भाजी विक्रेत्यांचे हाल; रोखठोक बारामतीकारांशी संवाद
Bajrang Sonawane on Dhananjay Munde : खूप आठवण येत असेल तर भेटायला जा, धनंजय मुंडेंना सल्ला
Udhayanidhi Stalin on Language War: हिंदी लादली तर लँग्वेज वॉर पुकारु,त्रिभाषा सूत्राला कडाडून विरोध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
माजी आमदार निर्मला गावित यांना कारने उडवले, अपघाताची भीषण घटना; रुग्णालयात उपचार सुरू
माजी आमदार निर्मला गावित यांना कारने उडवले, अपघाताची भीषण घटना; रुग्णालयात उपचार सुरू
गौरीच्या आई-वडिलांशी बोलल्या, अनंत गर्जेच्या वकिलावर संतापल्या अंजली दमानिया; म्हणाल्या, ते ॲब्सुलेटली रबीश
गौरीच्या आई-वडिलांशी बोलल्या, अनंत गर्जेच्या वकिलावर संतापल्या अंजली दमानिया; म्हणाल्या, ते ॲब्सुलेटली रबीश
Bollywood Drug Case: शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
मोठी बातमी : शक्ती कपूरच्या लेकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी, सिद्धांत कपूर मुंबई पोलिसांचं समन्स
Uddhav Thackeray & Sanjay Raut: येसSSSS संजय राऊत लवकरच तलवार घेऊन पुन्हा मैदानात दिसतील, बंगल्याबाहेर पडताच उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
येसSSSS संजय राऊत लवकरच तलवार घेऊन पुन्हा मैदानात दिसतील, बंगल्याबाहेर पडताच उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
अंग भाजल्यानं रुग्णालयात दाखल, यातना असह्य झाल्यानं रुग्णाने इमारतीच्या छतावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, भंडाऱ्यात थरार
अंग भाजल्यानं रुग्णालयात दाखल, यातना असह्य झाल्यानं रुग्णाने इमारतीच्या छतावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, भंडाऱ्यात थरार
Embed widget