एक्स्प्लोर

Orry : डोनाल्ड ट्रम्प यांना भारतातून केलं मतदान, ओरीच्या पोस्टमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का; नेटकरी म्हणाले, 'ओरीमुळेच ट्रम्प जिंकले'

Orry : सोशल मीडिया स्टार ओरीनेही डोनाल्ड ट्रम्प यांना मत दिलं होतं. त्यांच्या विजयानंतर त्याने खास पोस्ट शेअर केली आहे.

Donald Trump :  अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये बाजी मारत महासत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आपल्या हातात घेतल्या आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (Kamala Harris) यांचा डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या फरकाने पराभव केला. ट्रम्प यांच्या विजयानंतर जगभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षावर करण्यात येतोय. त्यातच ओरीनेही (Orry) डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मतदान केलं होतं आणि आता त्यांच्या विजयानंतर खास पोस्टही केली आहे. 

ओरीने अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये भारतातून मतदान केलं होतं. ओरीकडे अमेरिकेचं नागरिकत्व आहे. पण तो भारतात स्थायिक असून इथेच नोकरी करतो. त्याने अमेरिकेच्या निवडणुकांच्या वातावरणात कमला हॅरिस यांच्याविरोधातील प्रचारामध्ये सोशल मीडियावरुनच सहभाग घेतला होता. त्यानंतर आता ओरीने ट्रम्प यांच्या विजयानंतर त्यांना खास मेसेज करुनही शुभेच्छा दिल्या आहेत. 

ओरीने दिल्या डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा

ओरीने त्याच्या मतदानाचेही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याने डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान केल्याचंही त्याने सांगितलंय. त्याने ही पोस्ट शेअर करत म्हटलं की, 'आपण करुन दाखवलं डोनाल्ड...' त्याचप्रमाणे या पोस्टमध्ये त्याने ट्रॅम्प यांना टॅगही केलं आहे आणि त्यावर ट्रम्प यांनी ओरीला रिप्लायही केलाय. तो स्क्रिनशॉटही ओरीने शेअर केलाय. 

ओरीने डोनाल्ड ट्रम्प यांना केलं मतदान

ओरीने कॅप्शनमध्ये म्हटलं की, राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकांसाठी मी मतदानाचा हक्क बजावला असल्याचा मला अभिमान आहे. यावर नेटकऱ्यांच्याही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटलं की, तुला माहीत आहे का तुझ्या मुंबई मतदारसंघातून कोण निवडणूक लढवत आहे?' तसेच काहींनी अनफॉलो केल्याचंही कमेंटमध्ये म्हटलं आहे. 

कमला हॅरिस यांच्या विरोधात आहे ओरी

ओरीकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. तो फक्त भारतात राहतो आणि काम करतो. ओरीने कमला हॅरिस यांच्या प्रचार सभेतला एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. त्याचप्रमाणे त्याने कमला हॅरिस यांच्या नावाचीही खिल्ली उडवली होती. त्यानंतर ओरीवर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आल्याचं पाहायला मिळालं.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Orhan Awatramani (@orry)

ही बातमी वाचा : 

Donald Trump : 'एन्जॉय द कलियुग...', कमला हॅरिस यांना मतदान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयावर बॉलिवूड अभिनेत्रीची तीव्र नाराजी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझाHingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासRaj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
Embed widget