एक्स्प्लोर

जिगरबाज पोलिस कॉन्स्टेबल पवन तायडेला अक्षयकुमारचा सलाम

मुंबई : जिगरबाज पोलिस कॉन्स्टेबल पवन तायडे यांना बॉलिवूडचा खिलाडी, अभिनेता अक्षयकुमारने सलाम ठोकला आहे. लोणावळा रेल्वे स्थानकात धावत्या ट्रेनमधून उतरण्याच्या नादात तरुणी रेल्वे आणि फलाटामधील पोकळीत सापडली, मात्र तायडेंनी देवदुताप्रमाणे धाव घेत तिला वाचवलं. 'हा व्हिडिओ पाहताना मी क्षणभर हबकून गेलो. मात्र समयसूचकता दाखवून तत्परतेने तरुणीच्या मदतीला धावणारे लोणावळा पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल पवन तायडे यांना सॅल्यूट' असं अक्षयकुमारने ट्विटरवर म्हटलं आहे. https://twitter.com/akshaykumar/status/780347981929209856 धावत्या ट्रेनमधून उतरु नये अशा प्रकारच्या सूचना वारंवार देऊनही काही महाभाग विषाची परीक्षा घेतातच. लोणावळा रेल्वे स्थानकावर धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला रेल्वे पोलिसांमुळे जीवनदान मिळालं. धावत्या काकिनाडा एक्स्प्रेसमधून उतरताना एक तरुण आणि तरुणी प्लॅटफॉर्मवर उतरण्याचा प्रयत्न करताना पडले. तरुण रेल्वेपासून लांब फेकला गेला तर तरुणी मात्र रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील पोकळीत अडकली. ही दृश्य पाहताना प्लॅटफॉर्मवर उपस्थितांनी क्षणभर डोळे मिटले. मात्र फलाटावरील एका पोलिसांनी चपळाई दाखवत त्या तरुणीला बाहेर खेचलं. अंगावर शहारा आणणारा तो प्रसंग रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. जिगरबाज पोलीस कॉन्स्टेबल पवन तायडे यांच्यासह पोलीस नाईक राहुल मोरे आणि पोलीस कॉन्स्टेबल अजय गायकवाडही मदतीला धावून गेले.पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी काकिनाडा एक्सप्रेस लोणावळा स्टेशनवर आली तेव्हा सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला. दोन मिनिटांचा थांबा घेऊन रेल्वे मुंबईच्या दिशेने पुढे निघाली असता, एक वृद्ध व्यक्ती गाडीतून उतरण्याच्या प्रयत्नात फलाटावर पडली. तेव्हा फलाटावर उपस्थित काही प्रवाशांनी त्यांना बाजूला घेतलं आणि तिथं एकच गोंधळ उडाला. हे पाहून ड्युटी बजावत असलेल्या तायडे, मोरे आणि गाईकवाड यांनी तिकडे धाव घेतली. तितक्यात त्याच धावत्या रेल्वेच्या दुसऱ्या बोगीतून एका तरुणाने आणि तरुणीने देखील उतरण्याचा प्रयत्न केला. तो तरुण रेल्वेपासून दूर फेकला गेला मात्र ती तरुणी त्याच रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या पोकळीत पडली. यापूर्वीही अनेक वेळा धावत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या किंवा उतरण्याच्या नादात काही प्रवाशांनी जीव गमावले आहेत, तर काही जण जखमी झाले आहेत. असे प्रकार न करण्याच्या वारंवार सूचना पोलिस आणि रेल्वे प्रशासनाकडून दिल्या जाऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने अपघात घडत असल्याचं समोर आलं आहे.

धावत्या ट्रेनमधून उतरताना तरुणी फलाट-रेल्वेच्या पोकळीत पडली

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget