एक्स्प्लोर
राधिका आपटे आता बॉलिवूडच्या खिलाडीसोबत काम करणार?
मुंबई : बोल्ड सीन्समुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री राधिका आपटेला आता बॉलिवूडच्या खिलाडीसोबत काम करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि राधिका आपटे एकाच सिनेमात काम करणार असल्याची चर्चा आहे. जर या दोघांनी एकत्र काम केल्यास बॉलिवूडमध्ये एक वेगळं कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. पार्च्ड सिनेमातील हॉट सीनमुळे राधिका सध्या चर्चेत आहे.
आर. बल्की यांच्या आगामी सिनेमात काम करण्यासाठी अक्षय कुमारने होकार दिला आहे. आता आर. बल्की यांनी या सिनेमासाठी राधिका आपटेला साईन केलं आहे. आर. बल्की यांनी अद्याप आपल्या आगामी सिनेमची कथा रिव्हिल केली नाहीय. मात्र, या सिनेमात अक्षय कुमारसोबत दोन अभिनेत्री दिसणार आहेत. राधिका आपटेच्या निवडीनंतर दुसऱ्या अभिनेत्रीचाही आर. बल्की यांनी शोध सुरु केला आहे.
अक्षय कुमार सध्या केपटाऊनमध्ये दिवाळीची सुट्टी एन्जॉय करतोय. अक्षय तिकडून आल्यानंतर आगामी सिनेमावर चर्चा केली जाणार आहे. अक्षय कुमार आणि राधिका आपटे ही जोडी एकत्र पाहण्यासाठी सिनेरसिकांनाही उत्सुकता दिसून येते आहे. कारण अक्षयचा अॅक्शन हिरोचा अंदाज आणि राधिकाचे बोल्ड सीन्स. दोन्ही कलाकारांचे आपापले गुण आर. बल्की आपल्या आगामी सिनेमात नक्कीच वापरुन घेतली.
'मांझी - द माऊंटेन मॅन', 'पार्च्ड', 'कबाली' या सिनेमांमध्ये अभिनेत्री राधिका आपटेने वैविध्यपूर्ण भूमिका केल्या आहेत. त्यामुळे अक्षय कुमारसारख्या नावाजलेल्या अभिनेत्यासोबत काम करताना राधिकालाही वेगळा अनुभव मिळेल, यात शंका नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement