एक्स्प्लोर
‘दशक्रिया’ चित्रपटाला अखिल भारतीय ब्राम्हण संघाचा विरोध
'दशक्रिया' हा मराठी चित्रपट देखील वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण पुण्यात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने दशक्रिया सिनेमाला विरोध दर्शवला आहे.
![‘दशक्रिया’ चित्रपटाला अखिल भारतीय ब्राम्हण संघाचा विरोध akhil bhartiya bramhan sangha opposed to dashakriya movie latest update ‘दशक्रिया’ चित्रपटाला अखिल भारतीय ब्राम्हण संघाचा विरोध](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/14201543/VISHESH_WEB.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : ‘पद्मावती’ चित्रपटापाठोपाठ आता 'दशक्रिया' हा मराठी चित्रपट देखील वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण पुण्यात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने दशक्रिया सिनेमाला विरोध दर्शवला आहे.
चित्रपटात ब्राह्मण समाजाची बदनामी केल्याचा महासंघाचा आरोप आहे. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून 64 वा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. शुक्रवारी 17 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मात्र, आता सिनेमाला विरोध करणारं निवेदन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेकडे देण्यात आलं आहे.
सिनेमा प्रदर्शित झाल्यास त्याविरोधात महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा ब्राह्मण महासंघाकडून देण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)