Maidan | अजय देवगनच्या 'मैदान' चं पोस्टर रिलीज, ऑक्टोबर मध्ये चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
बॉलिवूड अभिनेता अजय देवगनने आपला आगामी चित्रपट 'मैदान' चं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलंय. हा चित्रपट ऑक्टोबर 2021 साली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अजय देवगन वेगळ्याच रंगात प्रेक्षकांसमोर येतोय.

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अजय देवगनने त्याच्या आगामी चित्रपट 'मैदान' चं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलंय. हा चित्रपट 15 ऑक्टोबर 2021 मध्ये रिलीज होणार आहे. 'मैदान' या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय फुटबॉलच्या सुवर्ण काळावर प्रकाश टाकला जाणार आहे.
अजय देवगनचा हा चित्रपट या पूर्वी ऑगस्ट 2021 मध्ये रिलीज होणार होता असं सांगण्यात आलं होतं. कोरोनाच्या संक्रमणामुळे चित्रपटाचं शुटिंग थांबवण्यात आलं होतं. त्याचा परिणाम चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेवर झाली. त्यामुळे आता या चित्रपटाच्या रिलीजची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.
अजय देवगनने त्याच्या 'मैदान' या चित्रपटाचं पोस्टर ट्विटरच्या माध्यमातून रिलीज केलंय. त्यानं लिहलंय की, "मैदान आता 2021 साली दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं शुटिंग जानेवारी 2021 मध्ये सुरु होईल."
‘Maidaan’ now releases worldwide in theatres on Dussehra 2021. Shoot commences January 2021.#Maidaan2021 #Priyamani @raogajraj @BoneyKapoor @iAmitRSharma @ItsAmitTrivedi @freshlimefilms @SaiwynQ @ActorRudranil @writish @saregamaglobal @ZeeStudios_ @ZeeStudiosInt pic.twitter.com/9KwxWP1vle
— Ajay Devgn (@ajaydevgn) December 12, 2020
अनेक भाषेत रिलीज होणार हा चित्रपट हिंदीसोबतच तामिळ, तेलगू आणि मल्याळम या प्रादेशिक भाषेत रिलीज होणार आहे. या चित्रपटात अजय देवगन सैय्यद अब्दुल रहीम यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सैय्यद अब्दुल रहीम हे 1950 ते 1963 या दरम्यान भारतीय फुटबॉल टीमचे कोच आणि मॅनेजर होते. या चित्रपटाची निर्मिती 'बधाई हो' या चित्रपटाचे निर्माते रविंद्रनाथ शर्मा करत आहेत. अजय देवगनच्या व्यतिरिक्त प्रियामणी, गजराज राव, बोमन ईराणी या चित्रपटात दिसणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
