'AK vs AK' च्या ट्रेलरवर भारतीय हवाई दलाचा आक्षेप, काही दृष्ये वगळण्याची सूचना
अनुराग कश्यप आणि अनिल कपूरचा आगामी 'AK vs AK' या मॉक्यूमेन्ट्री ड्रामाचा ट्रेलर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या चित्रपटातील काही दृष्यांवर भारतीय हवाई दलाने आक्षेप घेतले आहेत.

मुंबई: भारतीय हवाई दलाने एक ट्वीट करुन AK vs AK या चित्रपटातील काही आक्षेपार्ह दृष्ये वगळावीत असं नेटफ्लिक्सला सांगितलंय. हवाई दलाच्या गणवेशातील अनिल कपूर हवाई दलाला चुकीच्या पध्दतीने रंगवतोय असा आक्षेप घेत यातील काही आक्षेपार्ह दृष्य वगळावीत असं सांगितलं आहे.
या ट्रेलरमध्ये हवाई दलाच्या गणवेशातील अनिल कपूरने वापरलेली भाषा ही अर्वाच्य असून ती भारतीय हवाई दलाच्या नियमांचं उल्लंघन करते अशाही प्रकारचा आक्षेप हवाई दलानं घेतलाय.
The IAF uniform in this video is inaccurately donned & the language used is inappropriate. This does not conform to the behavioural norms of those in the Armed Forces of India. The related scenes need to be withdrawn.@NetflixIndia @anuragkashyap72#AkvsAk https://t.co/F6PoyFtbuB
— Indian Air Force (@IAF_MCC) December 9, 2020
नेटफ्लिक्सने भारतातील पहिला मॉक्यूमेन्ट्री ड्रामा AK vs AK चा एक ट्रेलर रिलीज केला. त्यात अनुराग कश्यप आणि अनिल कपूर यांचा एक सीन दाखवण्यात आला आहे. यामध्ये अनिल कपूरच्या मुलीचे, सोनम कपूरचे अपहरण करण्यात आलेलं असल्याचं दाखवण्यात आलंय. अनुराग कश्यप अनिल कपूरला दहा तासांच्या आत सोनमला शोधायचं आव्हान देतो. त्यानंतर हवाई दलाच्या गणवेशातील अनिल कपूर त्याच्या मुलीला शोधण्यासाठी सर्वत्र भटकत असल्याचं दाखवण्यात आलंय.
या चित्रपटात अनिल कपूर आणि अनुराग कश्यप यांच्यात संघर्ष दाखवण्यात आलाय. सोनम कपूरच्या अपहरणाभोवती या चित्रपटाची कथा फिरताना दिसते.
अनिल कपूर आणि अनुराग कश्यप यांच्यादरम्यान आक्षेपार्ह भाषेत संवाद दाखवण्यात आला आहे. त्यात जी भाषा वापरण्यात आलीय त्यावर आता हवाई दलानं आक्षेप घेत हवाई दलाचं चुकीच्या पध्दतीनं चित्र रंगवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आक्षेप घेतलाय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
