एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Aishwarya Rai Video: 'कायम स्वत:साठी उभं राहा...', घटस्फोटाच्या चर्चा सुरु असतानाच ऐश्वर्याचा व्हिडीओ चर्चेत; बच्चन कुटुंबियांची प्रतिक्रिया नाहीच?

Aishwarya Rai Video: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या रायने सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Aishwarya Rai Video: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अभिषेक (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या यांचा घटस्फोट होणार असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहे. मात्र, ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबीयांनी यावर मौन बाळगले आहे. घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान ऐश्वर्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या स्वतःची बाजू मांडताना दिसत आहे.

ऐश्वर्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती महिलांवरील हिंसाचार आणि अत्याचाराविषयी भाष्य करताना दिसतेय. महिलांविरुद्ध होणाऱ्या अत्याचाराविषयी आवाज उठवण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी ती भाष्य करताना दिसतेय. सध्या ऐश्वर्या आणि अभिषेक संदर्भात बऱ्याच बातम्या समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय. पण यावर अद्यापही ऐश्वर्या आणि अभिषेकने कोणत्याही प्रकारचं भाष्य केलं नाही.  

आत्मसन्मानाशी तडजोड करणार नाही - ऐश्वर्या राय

हा व्हिडीओ शेअर करत ऐश्वर्याने म्हटलं की, 'रस्त्यावर होणाऱ्या छळाचा सामना कसा करावा? त्या नजरांना टाळावं? नाही.. सरळ त्या नाजरांच्या डोळ्यात डोळे घालून पाहा... आपली मान कायमच उंच ठेवा. स्त्रीवादी... माझं शरीर...माझी किंमत...तुमच्या आत्मसन्मानाशी कधीही तडजोड करु नका...स्वतःवर संशय घेऊ नका. स्वतःसाठी उभे रहा.  तुमच्या ड्रेस किंवा लिपस्टिकला दोष देऊ नका.रस्त्यावरील छळ हा तुमचा दोष कधीच नसतो.

ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये काहीच ठीक नसल्याच्या अफवा सुरु असतानाच ऐश्वर्याचा हा व्हिडीओ समोर आला आहे. ऐश्वर्याने नुकतेच मुलगी आराध्याच्या बर्थडे बॅशचे फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये अभिषेक त्यांच्यासोबत नव्हता.  कोणत्याही फोटोमध्ये बच्चन कुटुंबातील कोणीही पार्टीला हजेरी लावली नाही. त्यानंतर घटस्फोटाच्या बातम्या समोर येतायत. 

अभिषेकने ऐश्वर्याचे मानले आभार

'द हिंदू'सोबत संवाद साधताना अभिषेकने म्हटलं की, मी खरंच खूप भाग्यवान आहे की, मला बाहेर जाऊन सिनेमा करण्याचा संधी मिळतेय. कारण मला माहितेय की आराध्यासोबत घरी ऐश्वर्या आहेत. त्यासाठी मी तिचे खरंच आभार मानतो. मुलं तुम्हाला कधीच कोणती तिसरी व्यक्ती म्हणून पाहत नाही. ते कायमच तुम्हाला त्यांच्या आयुष्यातली पहिली व्यक्ती म्हणून पाहत असतात.
 
पुढे त्याने म्हटलं की, जेव्हा माझा जन्म झाला, त्यावेळी माझ्या आईने अभिनय करायचा नाही, असा निर्णय घेतला. कारण तिला तिच्या मुलांसोबत वेळ घालवायचा होता. आम्हाला कधीच वडील आपल्या आजूबाजूला आहेत, ही जाणीव झाली नाही, कारण ते कायमच कामासाठी बाहेर असायचे आणि त्यांची उणीव आम्हाला भासायची.  

View this post on Instagram
 
A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb)

ही बातमी वाचा : 

Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mitkari On Naresh Arora : अरोरांनी अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढल्यानं कार्यकर्ते नाराजRamdas Athwale On Fadanvis : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनतील, शिंदेंना कोणतंच आश्वासन दिलं नव्हतंABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 26 November 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स-Sunil Bhusara Mumbai : मला मिळायला हवी ती मतं विरोधी उमेदवाराला मिळाली - सुनील भुसारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Embed widget