Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या-अभिषेकचा YouTube विरोधात 4 कोटींचा दावा, परवानगीशिवाय कपलचा AI व्हिडीओ वापरल्याची तक्रार
Bachchan Family Vs YouTube : खोट्या माहितीच्या आधारे प्रसारित झालेल्या व्हिडीओच्या आधारे एआय जनरेटेड व्हिडीओ व्हायरल होण्याचा धोका असल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे.

मुंबई : बॉलीवूडचे स्टार कपल ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांनी आता थेट गूगल (Google) आणि यूट्यूब (YouTube) विरुद्ध मोठा दावा दाखल केला आहे. दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) या दाम्पत्याने तब्बल 4 कोटींचा दावा दाखल केला आहे. आपल्या परवानगीशिवाय यूट्यूबने डीपफेक (Deepfake) आणि एआय कंटेंटमध्ये (AI Content Photo Video) फोटो आणि व्हिडीओ वापरल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. खोट्या माहितीवर आधारित असलेले हे व्हिडीओ प्रसारित करण्यात आल्याचं सांगत बच्चन दाम्पत्याने हा दावा दाखल केला आहे.
या आधी अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांनी असा दावा दाखल केला होता. आता अभिषेक-ऐश्वर्यानेही एआय दुरुपयोगाचा दावा दाखल केला आहे. एआय व्हिडीओ, फोटोसंबंधी असलेल्या यूट्यूबच्या नियमांवर बच्चन दाम्पत्याने चिंता व्यक्त केली आहे.
AI Content Video : खोट्या माहितीवर आधारित व्हिडीओ व्हायरल होऊ शकतात
या याचिकेत स्पष्ट केले आहे की YouTube आणि Google यांनी तयार केलेल्या पॉलिसीजमुळे थर्ड पार्टी कंटेंटचा गैरवापर होण्याची शक्यता वाढली आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार या दाम्पत्याचे म्हणणे आहे की, खोट्या माहितीवर आधारित असलेल्या आणि यूट्यूबवर अपलोड होणाऱ्या व्हिडीओंचा वापर एआय मॉडेल्स ट्रेनिंगसाठी होऊ शकतो. त्यामुळे पुढेही तशीच माहिती देणारे एआय व्हिडीओ तयार होऊन नियमांचे उल्लंघन करणारा कंटेंट मोठ्या प्रमाणावर पसरू शकतो.
Aishwarya Rai Bachchan Complaint : तक्रारीत नेमके काय म्हटले आहे?
अभिषेक आणि ऐश्वर्याने दाखल केलेल्या याचिकेत असा इशारा दिला आहे की, AI Platforms अनेकदा कलाकारांना नकारात्मक पद्धतीने दाखवतात. त्यामुळे त्यांची प्रतिमा (Image Rights) आणि वैयक्तिक अधिकार धोक्यात येतात. चुकीच्या माहितीवर प्रसारित झालेल्या व्हिडीओंमुळे खोटी आणि बदनामीकारक माहिती जलद गतीने पसरू शकते.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नातेसंबंधांवर अनेकदा वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात. हे दोघेही घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चाही अनेकदा रंगतात. मात्र अभिषेकने अशा अनेक अफवांचे खंडन केले आहे. त्याने सार्वजनिकरित्या ऐश्वर्याविषयी फारसे बोलणे टाळले असले तरी तिच्या कौतुकाचे त्याचे जुने इंटरव्ह्यू आजही चर्चेत असतात.
ही बातमी वाचा:























