एक्स्प्लोर
Advertisement
निवृत्तीनंतर मी कॅनडामध्ये स्थायिक होणार, अक्षय कुमारचा जुना व्हिडीओ व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अराजकीय मुलाखत घेणारा बॉलिवूडचा 'खिलाडी' म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून ट्रोल होतोय. ट्रोलर्सना अक्षय कुमारला ट्रोल करण्यासाठी आता अजून एक कारण मिळाले आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींची अराजकीय मुलाखत घेणारा बॉलिवूडचा 'खिलाडी' म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून ट्रोल होतोय. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 29 मे रोजी मुबंईत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नानेही मतदान केले. मात्र अक्षय कुमार कुठेही दिसला नाही. अक्षय कुमार कॅनडा या देशाचा नागरिक असल्यामुळे तो मतदान करु शकला नाही, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्याला ट्रोल केले जात आहे.
कँनडाच्या नागरिकत्वावरून ट्रोल होत असतानाच आता अक्षय कुमारचा एक जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल केला जात आहे. हा व्हिडीओ कॅनडामध्ये शुट केलेला आहे. अक्षय कुमार या व्हिडीओमध्ये कॅनडावासियांना सांगतो की, "मी माझ्या फिल्मी करिअरमधून निवृत्त झाल्यानंतर कॅनडामध्ये स्थायिक होणार आहे."
हा व्हिडीओ कॅनडामधील टोरांटो येथील आहे. टोरांटोमधील नागरिकांना अक्षय कुमार म्हणतो की, "मला तुम्हाला सांगायचं आहे की, हे (टोरांटो, कॅनडा) माझं घर आहे. मी इंडस्ट्रीमधून (फिल्मी जग) निवृत्त झाल्यानंतर कॅनडामध्ये स्थायिक होणार आहे."
व्हायरल होत असलेला तो व्हिडीओ पाहा
अक्षय कुमारच्या नागरिकत्वाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून देशभर चर्चा सुरु आहेत. त्यावरुन त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाऊ लागले आहे. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी अक्षय कुमारने स्वत: त्याच्या नागरिकत्वाबाबत भाष्य केले होते. VIDEO | कॅनेडियन नागरिकत्त्वावर अक्षय कुमारचं काय म्हणणं आहे? | एबीपी माझा अक्षय कुमार म्हणाला की, मला माझी देशभक्ती सिद्ध करण्याची गरज नाही. अनेकांकडून माझ्या नागरिकत्वाबाबत उगाचच रुची दाखवली जात आहे आणि सातत्यानं त्यावरुन वाद निर्माण केला जात आहे. मी माझं नागरिकत्व कधीही लपवलेलं नाही आणि ते कधी नाकारलेलं नाही. मात्र मी गेल्या सात वर्षांपासून कॅनडाला गेलो नाही, ही गोष्टही खरी आहे. मी भारतात काम करतो आणि भारतातील सर्व कर भरतो. एवढ्या वर्षात मला कधीही भारताप्रती असलेलं प्रेम सिद्ध करावं लागलं नाही.""Toronto is my home, after I retire from this industry I will settle in Canada" pic.twitter.com/Ypet1U0oBJ
— Tarique Anwer (@tanwer_m) May 3, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement