Sophia Leone Death : अडल्ट फिल्म स्टार सोफिया लिओनचे वयाच्या 26 व्या वर्षी निधन; राहत्या घरातच आढळली मृतावस्थेत
Sophia Leone Death : अडल्ट फिल्म स्टार सोफिया लिओनचे वयाच्या 26 व्या वर्षी निधन झाले आहे. राहत्या घरातच अभिनेत्री मृतावस्थेत आढळली आहे.
Sophia Leone : अडल्ट फिल्म स्टार सोफिया लिओनचे (Sophia Leone) निधन झाले आहे. वयाच्या 26 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. राहत्या घरातच ती मृतावस्थेत आढळली आहे. तिच्या निधनानंतर इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सोफिया लियोनच्या सावत्र वडिलांनी तिच्या निधनाची बातमी दिली आहे.
सोफियाच्या निधनानंतर तिचे सावत्र वडील माइक रोमेरो 'गो फाऊंड मी'सोबत बोलताना म्हणाले,"सोफियाच्या निधनाने आम्हा सर्वांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या निधनाची बातमी सांगताना आम्हाला प्रचंड दु:ख होत आहे. 1 मार्च 2024 रोजी सोफियाचा अपार्टमेंटमध्ये मृतदेह आढळला".
सोफिया सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह होती. गेल्या आठवड्यात तिने काही पोस्टदेखील शेअर केल्या होत्या. स्थानिक पोलीस सध्या सोफियाच्या मृत्यूप्रकरणी तपास करत आहेत. अभिनेत्रीला प्राण्यांची खूप आवड होती. तिच्याकडे तीन पाळीव प्राणी आहेत. तसेच प्रवासाची तिला भयंकर आवड होती. आसपासच्या लोकांना आनंदी ठेवण्यासाठी ती कायम प्रयत्न करायची.
सोफियाच्या आकस्मिक मृत्यूने तिच्या कुटुंबावर आणि मित्रांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. 1 मार्च 2024 रोजी सोफियाचे कुटुंब तिच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते पण त्याला ती प्रतिसाद देत नव्हती. सोफियाच्या मृत्यूचा तपास सध्या स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे. सोफिया ही एक चांगली मुलगी, बहीण, नात, भाची आणि मैत्रिणी होती. तिला प्राण्यांची आवड होती. तसेच तिला फिरायला आवडायचे.", असंही सोफियाच्या सावत्र वडिलांनी सांगितलं.
तीन महिन्यात चार अडल्ट फिल्म स्टारचं निधन
गेल्या तीन महिन्यात चार अडल्ट फिल्म स्टारचं निधन झालं आहे. 36 वर्षीय Kagney Lee ने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्याआधी जानेवारी महिन्यात जेसी जेन तिचा बॉयफ्रेंड ब्रेट हासनमुलरसोबत मृतावस्थेत आढळून आली होती. अशातच आता वयाच्या 26 व्या वर्षी सोफियाचं निधन झालं आहे. चाहते आता सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.
संबंधित बातम्या