(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Adnan Sami: सर्जरी करुन कमी केलं 130 किलो वजन?; अदनान सामी म्हणाला...
अदनान (Adnan Sami) हा त्याच्या फिटनेस जर्नीमुळे चर्चेत असतो. त्याचं फिटनेस ट्रान्सफॉर्ममेशन पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले होते.
Adnan Sami: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अदनान सामीनं (Adnan Sami) हा त्याच्या गाण्यांनी नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. अदनान हा त्याच्या फिटनेस जर्नीमुळे चर्चेत असतो. त्याचं फिटनेस ट्रान्सफॉर्ममेशन पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले होते. अदनान सामीनं एका मुलाखतीमध्ये त्याच्या नेट लॉस जर्नीबाबत सांगितलं आहे.
काय म्हणाला अदनान सामी?
एका मुलाखतीदरम्यान, अदनान सामीने सांगितले की त्याने न्यूट्रीनिस्टच्या मदतीने वजन कमी केले. त्या न्यूट्रीनिस्टनं त्याला आहार कमी न करता जीवनशैली बदलण्यास सांगितले.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये अदनान सामी म्हणाला, 'मी माझे वजन कसे कमी केले यावर अनेक लोक प्रश्न उपस्थित करतात. लोक म्हणतात की, मी सर्जरी केली. लिपोसक्शन झाले, पण मी असे काहीही केलेलं नाही.'
पुढे अदनान सामी म्हणाला, 'माझे वजन 230 किलो होते. लंडनमधील एका डॉक्टरने मला अल्टिमेटम दिला. त्याने मला सांगितले की तू ज्या प्रकारे तुझे जीवन जगत आहेस त्यानुसार, येत्या सहा महिन्यांत तुझ्या पालकांना हॉटेलच्या एका खोलीत तुझा मृतदेह दिसले आणि असं झालं तर मला आश्चर्य वाटणार नाही. माझे वडील हे सर्व ऐकत होते.'
माझे वडील म्हणाले, 'तुला जे सहन करावे लागले ते सर्व मी भोगले आहे. प्रत्येक सुख-दु:खात मी तुझ्यासोबत आहे. मी तुला कधीच काही मागितले नाही, पण माझी एकच विनंती आहे, तू वजन कमी करावे. मी तुला दफन करू शकत नाही, कोणत्याही वडिलांनी आपल्या मुलाचे दफन करू नये. हे ऐकल्यानंतर अदनान सामीने त्याच्या वडिलांना वचन दिले की तो त्याचे वजन कमी करेल. पुढे मुलाखतीत अदनान सामी म्हणाला, 'मी टेक्सासला गेलो आणि तिथे मी एक चांगला न्यूट्रीनिस्ट शोधला. त्यांनी माझी लाईफस्टाईल बदलली. त्यांनी मला सांगितलं की, आयुष्यभर मला ही लाईफस्टाईल फॉलो करावी लागेल. '
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: