Adipurush : महाशिवरात्रीच्या दिवशी प्रभासच्या आदिपुरूषची रिलीज डेट जाहीर; 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Adipurush : कृतीने सोशल मीडियावर (Kriti Sanon) नुकतीच पोस्ट शेअर केली आहे.
Adipurush : बॉलिवूडमधील काही आगामी चित्रपटांच्या रिलीज डेट्स जाहीर झाल्या आहेत. गेली अनेक दिवस अभिनेता प्रभासच्या (Prabhas) आदिपुरूष (Adipurush) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात आहेत. या चित्रपटाची नुकतीच रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. अभिनेत्री कृती सेनन हिने (Kriti Sanon) नुकतीच या चित्रपटाबद्दलची एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
कृतीनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिली, 'आदिपुरूष हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये 12 जानेवारी 2023 रोजी 3D मध्ये प्रदर्शित होणार आहे.' आदिपुरूष चित्रपटामध्ये कृती सेनन, प्रभास, सनी सिंह आणि सैफ अली खान हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
View this post on Instagram
आदिपुरुष चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार आणि रेट्रोफिल्सचे राजेश नायर यांनी केली आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या