![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Adipurush OTT Release : प्रेक्षकांनी नापसंत केलेला 'आदिपुरुष' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कुठे पाहाल चित्रपट? जाणून घ्या ...
Adipurush : 'आदिपुरुष' हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.
![Adipurush OTT Release : प्रेक्षकांनी नापसंत केलेला 'आदिपुरुष' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कुठे पाहाल चित्रपट? जाणून घ्या ... Adipurush OTT Release When And Where To Watch Prabhas Kriti Sanon Starrer Film Adipurush Online Adipurush OTT Release : प्रेक्षकांनी नापसंत केलेला 'आदिपुरुष' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कुठे पाहाल चित्रपट? जाणून घ्या ...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/25/c4be557f661ebadf275d0f1bcbf7c9dd1690268066707254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Adipurush OTT Release Date : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas) आणि दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. 16 जून 2023 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता प्रेक्षकांनी नापसंत केलेला हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
'आदिपुरुष' ओटीटीवर कधी रिलीज होणार?
'आदिपुरुष' हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे. 1 ऑगस्ट 2023 रोजी हा सिनेमा प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सिनेमागृहात फ्लॉप ठरलेला 'आदिपुरुष' सिनेमा प्रेक्षक आता ओटीटीवर पाहू शकतात. बॉक्स ऑफिसवर आपटलेला हा सिनेमा ओटीटीवर धमाका करू शकेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
View this post on Instagram
'आदिपुरुष' हा सिनेमा रिलीजआधीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. वीएफएक्स आणि पात्रांचे चुकीचे चित्रण केल्यामुळे या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. 600 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला. प्रेक्षकांच्या पसंतीसह बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यातही कमी पडला आहे.
'आदिपुरुष'बद्दल जाणून घ्या.. (Adipurush Movie Details)
'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा रामायणावर आधारित आहे. या सिनेमात प्रभास (Prabhas) रामाच्या, कृती सेनन (Kriti Sanon) सीता मातेच्या भूमिकेत दिसत आहे. तर लक्ष्मणाच्या भूमिकेत सनी सिंह, रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि हनुमानाच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे (Devdatta Nage) आहे. ओम राऊतने (Om Raut) 'आदिपुरुष' सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
ओटीटी रिलीजआधी 'आदिपुरुष' हा सिनेमा युट्यूबवर लीक झाला होता. एडडी क्वालिटीमध्ये युट्यूबवर लीक झालेल्या या सिनेमाला अल्पावधीतच 2.3 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले होते. पण नंतर हा सिनेमा युट्यूबवरुन काढून टाकण्यात आला. आता पुन्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षक घरबसल्या पाहू शकतात. 'आदिपुरुष' सिनेमाला भारतात बंदी घालण्याची मागणी होत होती. पण भारतात या सिनेमाने 128 कोटींची कमाई केली आहे. आता ओटीटीवर प्रदर्शित होण्यास हा सिनेमा सज्ज आहे.
संबंधित बातम्या
Adipurush : प्रेक्षकांची नापसंती मिळालेला ओम राऊतचा 'आदिपुरुष' युट्यूबवर लीक; काही मिनिटांतच मिळाले दोन मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)