Manoj Muntashir: "बजरंगबली हे देव नव्हाते, ते..."; मनोज मुंतशीर यांचे वक्तव्य ऐकून नेटकरी भडकले, म्हणाले, 'गप्प बस'
आदिपुरुष चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांना देखील गेल्या काही दिवसांपासून ट्रोल केलं जात आहे.
Manoj Muntashir: प्रभास (Prabhas), क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा आदिपुरुष (Adipurush) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील डायलॉग्स, चित्रपटामधील कलाकारांचे लूक्स यांना अनेक जण ट्रोल करत आहेत. आदिपुरुष चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांना देखील गेल्या काही दिवसांपासून ट्रोल केलं जात आहे. सध्या मनोज मुंतशीर यांच्या एका वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. एका मुलाखतीमध्ये मनोज मुंतशीर यांनी सांगितलं की, "बजरंगबली हे देव नव्हाते, ते भक्त होते."
मनोज मुंतशीर यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की मनोज मुंतशी हे चित्रपटात वापरण्यात आलेल्या डायलॉग्सबद्दल सांगितलं, "चित्रपटात सोपी भाषा वापरण्याचा उद्देष हा होता की, बजरंगबली यांना आपण विद्येचा देवता मानतो. बजरंगबली यांच्याकडे पर्वतासारखं बळ आहे, पण तेच बजरंगबली हे एका बालकासारखे देखील आहेत. बजरंगबली हे प्रभू श्रीराम यांच्यासारखं बोलत नाहीत" पुढे मनोज मुंतशीर यांनी सांगितलं, "बजरंगबली हे देव नाहीयेत. ते भक्त आहेत. आपण त्यांना देव केलं कारण त्यांच्या भक्तीमध्ये तेवढी शक्ती होती."
मनोज मुंतशीर यांच्या या वक्तव्यावर अनेक नेटकऱ्यांनी टीका केली आहे. एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'मनोज तुझ्या मूर्खपणाचा रोज नवा अध्याय लिहिणे बंद कर, गप्प बस, अजून वेळ आहे, का विनाकारण लोकांना भडकवत आहेस? तुझ्या मेंदूचा वापर करणं बंद कर.' तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, तू मूर्ख आहेस मनोज,अजूनही वेळ गेली नाहीये. गप्प बस."
आदिपुरुष चित्रपटाच्या शोदरम्यान चित्रपटगृहात भगवान हनुमानासाठी एक जागा राखीव ठेवण्यात आली होती. या चित्रपटात अभिनेता देवदत्त नागेनं बजरंगबलींची भूमिका साकारली आहे. आदिपुरुष चित्रपटातील बजरंगबलींच्या एका डायलॉगला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं.
रिपोर्टनुसार, 600 कोटींच्या बजेटमध्ये आदिपुरुष या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ओम राऊतनं आदिपुरुष या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आदिपुरुष हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अभिनेता प्रभासनं या चित्रपटात प्रभू श्रीरामची भूमिका साकारली आहे तर अभिनेत्री कृती सेनननं आदिपुरुष या चित्रपटात सीता ही भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या