(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Adipurush Box Office Collection Day 4 : 'आदिपुरुष' बॉक्स ऑफिसवर आपटला; रिलीजच्या चौथ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी घसरण
Adipurush Box Office Collection : 'आदिपुरुष' हा सिनेमा रिलीजच्या चौथ्या दिवशीच बॉक्स ऑफिसवर आपटला आहे.
Adipurush Box Office Collection Day 4 : ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. 16 जून 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने 241.10 कोटींची कमाई केली आहे.
'आदिपुरुष'च्या कमाईत मोठी घट
'आदिपुरुष' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 86.75 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 65.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 69.1 कोटी आणि चौथ्या दिवशी 20 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत आतापर्यंत या सिनेमाने 241.10 कोटींची कमाई केली आहे. पण रिलीजच्या चौथ्याच दिवशी या सिनेमाच्या कमाईत मोठी घट झाली आहे.
पहिला दिवस : 86.75 कोटी
दुसरा दिवस : 65.25 कोटी
तिसरा दिवस : 69.1 कोटी
चौथा दिवस : 20 कोटी
प्रभास आणि कृती सेननचा'आदिपुरुष' हा सिनेमा पौराणिक सिनेमा रामायणावर आधारित आहे. त्यामुळे या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. पण सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत.
View this post on Instagram
'आदिपुरुष' या सिनेमाची निर्मिती 500 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या सिनेमाने चांगलीच कमाई केली होती. त्यामुळे रिलीजच्या पहिल्या दिवसांत या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यश आलं आहे.
'आदिपुरुष' सिनेमातले वादग्रस्त संवाद आठवडाभरात बदलणार; निर्मात्यांचा मोठा निर्णय
'आदिपुरुष' सिनेमातील संवाद, दृश्ये, संवाद, व्हीएफएक्स अशा अनेक गोष्टींवर टीका होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या भावनांचा आदर करत निर्मात्यांनी या सिनेमातील वादग्रस्त संवाद बलण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांतच सिनेमाची सुधारित आवृत्ती सिने-रसिकांसमोर येणार आहे. आदिपुरुषचे संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
रामकथा से पहला पाठ जो कोई सीख सकता है, वो है हर भावना का सम्मान करना.
— Manoj Muntashir Shukla (@manojmuntashir) June 18, 2023
सही या ग़लत, समय के अनुसार बदल जाता है, भावना रह जाती है.
आदिपुरुष में 4000 से भी ज़्यादा पंक्तियों के संवाद मैंने लिखे, 5 पंक्तियों पर कुछ भावनाएँ आहत हुईं.
उन सैकड़ों पंक्तियों में जहाँ श्री राम का यशगान…
संबंधित बातम्या