एक्स्प्लोर
विद्या बालनला 'तो' प्रश्न आता विचारला जात नाही!
विद्या प्रत्येक मुद्द्यावर कायमच आपलं बेधडक मत मांडते. तिचा हा अंदाज पुन्हा एकदा 'तुम्हारी सुलु'च्या निमित्ताने दिसला.
मुंबई : बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री विद्या बालनला सर्रास विचारला जाणारा प्रश्न आता मात्र विस्मरणात गेला आहे. स्वत: विद्यानेच ह्याची आठवण करुन दिली आहे.
आगामी 'तुम्हारी सुलु' या सिनेमाबाबत मीडियाशी बोलताना विद्या बालन म्हणाली की, "आता मीडियाने मला एक प्रश्न विचारणं बंद केला आहे आणि तो प्रश्न माझ्या आई बनण्यासंदर्भातील आहे."
विद्या प्रत्येक मुद्द्यावर कायमच आपलं बेधडक मत मांडते. तिचा हा अंदाज पुन्हा एकदा 'तुम्हारी सुलु'च्या निमित्ताने दिसला.
विद्या म्हणाला की, "लग्नानंतर माझ्या आई बनण्यासंदर्भात मीडिया सातत्याने प्रश्न विचारत असे. पण आता हा प्रश्न गायब आहे. मीडिया आता हा प्रश्न विचारत नाही. कदाचित त्यांच्यासाठी हा प्रश्न आऊटडेटेड झाला आहे."
विद्या बालनचं लग्न 2012 रोजी निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरसोबत झालं होतं.
तुम्हारी 'सुलु' हा विद्याचा यंदाच्या वर्षातील दुसरा सिनेमा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 'बेगमजान' प्रदर्शित झाला होता. 'तुम्हारी सुलु'चं दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी यांनी केलं असून 17 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.
'तुम्हारी सुलू'मध्ये विद्या बालनसह नेहा धुपिया आणि मानव कौल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमात विद्या बालन आई, पत्नी आणि एका आरजेची भूमिका साकारणार आहे. सिनेमात श्रीदेवीच्या 'हवाहवाई' प्रसिद्ध गाण्यावर विद्या बालन, नेहा धुपिया आणि इतर कलाकार डान्स करताना दिसतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement