एक्स्प्लोर
घरचं जेवण सोडून श्रद्धाने महिन्याला दीड लाखांचा डब्बा लावला!
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या फिटनेसबाबत फारच चिंतेत आहे. तिला आणखी स्लिम व्हायचं आहे. वजन कमी करण्यासाठी तिने महिन्याला तब्बल दीड लाख रुपयांचा डब्बा लावला आहे.
श्रद्धाने वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. यासाठी श्रद्धाने केवळ सेलिब्रिटी ट्रेनर आणि न्यूट्रिशनिस्ट हायर केला नाही, तर खास प्रकारच्या जेवणासाठी डब्बा लावला आहे. महत्त्वाचं म्हणजे या डब्ब्यासाठी ती दर महिन्याला दीड लाख रुपये खर्च करत आहे.
डब्ब्यात काय आहे खास?
श्रद्धाचे वडील शक्ती कपूर पंजाबी तर आई कोल्हापूरची आहे. त्यामुळे तिच्या घरी या दोन्ही प्रकारचं जेवण बनतं. मात्र श्रद्धाने या दोन्ही प्रकारच्या जेवणाला फाटा दिला आहे. तिने लावलेल्या डब्ब्यात सहा प्रकारचे व्यंजनांचा समावेश आहे. यामध्ये प्रोटिन्स, नट्स, बीन्स आणि सॅलडचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. श्रद्धाला जेवणाचा नवा मेन्यू अतिशय आवडत असल्याचं म्हटलं जात आहे.
2013 मध्ये 'आशिकी 2' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी श्रद्धा कपूर हैदर, एक व्हिलन, ABCD 2, रॉकऑन 2' या सिनेमातही दिसली आहे. तर ओके जानू, हाफ गर्लफ्रेण्ड आणि हसीना हे तिचे आगामी चित्रपट आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement