चंद्रपुरातील बछड्यांच्या मृत्यूनंतर रविना टंडनचा संताप
चंद्रपुरात बछड्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर रविनाचा चांगलाच संताप झाला आणि तिने ट्विटरवरुन आपल्या रागाला मोकळी वाट करुन दिली.
And they want to build highways and metro sheds, give away more forest land across the country . This???????? is murder . https://t.co/ZmHKR7TH86
— Raveena Tandon (@TandonRaveena) November 15, 2018
'एका जंगलातून दुसरीकडे जाण्यासाठी अंडरपास बांधले, तर असे अपघात टाळता आले असते. किंवा जंगलाला कुंपण घातलं असतं, तरी वाघांचे बछडे आज जिवंत असते' असं रविनाने तिसऱ्या ट्वीटमध्ये सिंगापूरमधील एक फोटो शेअर करत म्हटलं आहे.Could’ve been prevented if these ways are built but fenced off and underpasses are built for wildlife to move from forest to forest. Metro shed in Aarey forest will show us more such disasters . @saveaarey https://t.co/7o78D1IZlO
— Raveena Tandon (@TandonRaveena) November 15, 2018
Yes these are underpasses . Simple but effective , elevated highways like the metro elevation corridors through forests can also help . https://t.co/O8Z0mHDPJZ
— Raveena Tandon (@TandonRaveena) November 15, 2018
तीन बछड्यांचा मृत्यू चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना-मामला मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. दोन्ही बछडे अंदाजे सहा ते आठ महिन्यांच्या मादी होत्या. त्यानंतर आणखी एक बछडा जवळच्या झुडपात मृतावस्थेत आढळला. जुनोना जंगल परिसरात एक वाघीण आपल्या बछड्यांसोबत रेल्वे ट्रॅक ओलांडत होती. त्यावेळी बल्लारपूरवरुन गोंदियाकडे जाणाऱ्या पॅसेंजर गाडीने तिच्या बछड्यांना जोरदार धडक दिली. विशेष म्हणजे बल्लारपूर-गोंदिया रेल्वेमार्गावर दोन्ही बाजूला अतिशय घनदाट जंगल आहे. त्यामुळे रेल्वे ट्रॅक ओलांडताना आतापर्यंत अनेक वाघ, बिबटे, रानगवे, चितळ आणि रानडुक्कर यांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची वाढती संख्या हा सर्वत्र चर्चेचा आणि आनंदाचा विषय आहे. सरकार हे आकडे सांगून स्वतःची पाठही थोपटून घेतं. मात्र अपघातामुळे वाघांचे होणारे मृत्यू थांबवण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.Wish this was implemented with each highway development plan. Doesn’t hamper development and progress and our wildlife also taken care care off. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @wti_org_india @SMungantiwar @anishandheria https://t.co/mTsSzJuGL4
— Raveena Tandon (@TandonRaveena) November 15, 2018