बॉलिवूडच्या देसी गर्लने विकले मुंबईतले 4 आलिशान फ्लॅट्स, विक्रीची किंमत वाचून चकित व्हाल!
Priyanka Chopra ने तिचे चार अपार्टमेंट्स विकले आहेत. हे चारही अपार्टमेट हे मुंबई शहरातील अत्यंत महागड्या भागात होते. या अपार्टमेंट्सची किंमत कोट्यवधीमध्ये आहे.

Priyanka Chopra : बॉलिवुडी देसी गर्ल प्रियांका चोप्राचं आज जगभरात नाव आहे. आज कोट्यवधी लोक तिचा अभिनय आणि सौंदर्याचे दिवाने आहेत. प्रियांका चोप्रा अभिनयासोबतच इतरही अनेक क्षेत्रांत सक्रिय आहे. तिने आतापर्यंत अनेक उद्योगांत आर्थिक गुंतवणूक केलेली आहे. विशेष म्हणजे तिने अनेक ठिकाणी घर खरेदी करून पैशांची गुंतवणू करून केलेली आहे. दरम्यान, तिने मुंबईतील असेच चार आलिशान अपार्टमेट्स विकले असल्याची माहिती समोर येत आहे.
चार अपार्टमेंट्स विकले, किंमत किती?
मिळालेल्या माहितीनुसार प्रियांका चोप्राने विकलेले चारही आलिशान अपार्टमेंट्स हे ओबेरॉय स्काय गार्डनर येथे होते. या चारही अपार्टमेंट्सची किंमत 16.17 कोटी रुपयांना विकण्यात आले आहेत. या चारपैकी तीन अपार्टमेंट्स हे 18 व्या मजल्यावर होते. तर 1 फ्लॅट हा 19 व्या मजल्यावर होता. पहिले अपार्टमेंट हे 3.45 कोटी रुपयांना विकले आहे. तर दुसरे आणि तिसरे अपार्टमेंट 2.85 कोटी आणि 3.52 कोटी रुपयांना विकण्यात आहे आहेत. प्रियांका चोप्राचा चौथा फ्लॅट हा 6.35 कोटी रुपयांना विक्री झाला आहे.
राजमौली यांच्या चित्रपटात दिसणार
गायक निक जोनास याच्याशी लग्न केल्यानंतर प्रियांका चोप्रा 2018 साली यूएसमध्ये शिफ्ट झाली आहे. आता युएसमध्ये तिचे घर आहे. ती आपला पती आणि मुलीसोबत राहते. कामानिमित्ता किंवा कुटुंबाला भेटायला ती भारतात येते. नुकतेच ती आपल्या भावाच्या लग्नासाठी भारतात आली होती. भावाच्या लग्नात तिने चांगलीच धमाक केली होती. प्रियांका चोप्रा दिग्दर्शक एसएएस राजामौली यांच्या एका चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. याच चित्रपटाबाबत चर्चा करण्यासाठी ती नुकतेच भारतात आली होती. या चित्रपटात महेशबाबू प्रमुख भूमिकेत आहे.
बॉलिवुडच्या चित्रपटात शेवटी कधी दिसली
बॉलिवुडमध्ये नाव कमवल्यानंतर आता प्रयांका चोप्रा परदेशांतील अनेक मोठ्या चित्रपटांत झळकली आहे. बॉलिवुडमधील द स्काय इज पिंक या चित्रटात ती शेवटचं दिसली होती. तिचा हा चित्रपट 2019 साली रिलीज झाला होता. या चित्रपटात जयरा वसीम, रोहित शराफ, फरहान अख्तर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत होते. ती जिंदगी जिले जरा या चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र हा चित्रपट कधी येऊच शकला नाही. या चित्रपटाचे शूटिंगच झाले नाही. या चित्रपटात प्रियांकासोबत कतरिना कैफ, आलिया भट्ट या प्रमुख अभिनेत्री दिसणार होत्या.
हेही वाचा :
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचा देसी अंदाज ; पिवळ्या साडीत दिसतेय खास!
Sonali Bendre : परमसुंदरी मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा व्हायरल लूक; फोटो पाहाचं!























