एक्स्प्लोर

Jiah Khan Suicide Case Sooraj Pancholi: सूरज पांचोलीचे काय होणार? अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी सीबीआय कोर्ट सुनावणार निकाल

अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) आत्महत्या प्रकरणी उद्या (28 एप्रिल) स्पेशल सीबीआय कोर्ट निकाल देणार आहे.

Jiah Khan Suicide Case Sooraj Pancholi:  अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) हिने 10 वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. जिया खानच्या आत्महत्येनंतर जिया खानच्या (Jiah khan) आईनं अभिनेता सूरज पांचोलीवर (Sooraj Pancholi) गंभीर आरोप केले होते. या प्रकरणावर आता उद्या (28 एप्रिल)  स्पेशल सीबीआय कोर्ट हे अंतिम निकाल देणार आहे. जिया खान आत्महत्या प्रकरणी सूरज पांचोली  काही काळ तुरुंगात होता. त्यानंतर त्याची सुटका झाली. आता या 10 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणातून सूरज पांचोलीची सुटका होईल की, त्याच्या अडचणीत वाढ होईल? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळणार आहे.

जिया खान आत्महत्या प्रकरणासंदर्भात नुकत्याच झालेल्या सुनावणीत स्पेशल सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश एएस सय्यद यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. यानंतर न्यायमूर्ती सय्यद यांनी आपला निर्णय राखून ठेवला होता. ते उद्या (28 एप्रिल)  निर्णय देतील. 

आत्महत्येपूर्वी जिया खानने लिहिले होते पत्र

 3 जून 2013 रोजी जिया खानने मुंबईतील जुहू येथील तिच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली होती. जियाच्या मृत्यूनं मनोरंजनसृष्टी हादरली होती. आत्महत्येपूर्वी जिया खानने सहा पानी पत्र लिहिले होते, ज्यात तिने सूरज पांचोलीवर गंभीर आरोप केले होते. नंतर जियाच्या आईनं देखील सूरजवर आरोप केले होते. 

 जियाच्या आईनं सूरजवर केले गंभीर आरोप


17 ऑगस्ट रोजी जिया खानची आई राबिया खान यांनी न्यायाधीश एएस सय्यद यांच्यासमोर जियाच्या आत्महत्या प्रकरणी साक्ष नोंदवली. राबिया खान यांनी कोर्टाला जियाची बॉलिवूडमधील एन्ट्री, तिची कारकीर्द, आणि सूरज पांचोलीसोबतचे नाते याबद्दल सांगितले.  राबिया खान  यांनी सांगितलं होतं की, 'जियानं मला सांगितलं होतं की, सूरज हा तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा.' 

आत्महत्येपूर्वी जिया खानने सहा पानी पत्र लिहिले होते, ज्यात तिने सूरज पांचोलीवर गर्भपात आणि मारहाणीचा आरोप केला होता. या प्रकरणात सूरज पांचोलीही काही काळ तुरुंगात होता. मात्र, सूरज पांचोलीने जिया खानच्या आत्महत्येसाठी कधीही स्वत:ला जबाबदार धरले नाही. तो म्हणाला होता की, जिया खानवर लहान वयातच कामाचा खूप ताण होता आणि त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती. या ताणातून तिने हे पाऊल उचलले, असे त्याने म्हटले होते.

जिया खानचे चित्रपट

जिया खानने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले होते. जिया खानने अमिताभ बच्चन यांच्यासोबत  'निशब्द' या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली. तसेच तिनं आमिर खानसोबत 'गजनी' आणि अक्षय कुमारचा सुपरहिट चित्रपट 'हाऊसफुल'मध्ये काम केले. जियाच्या मृत्यूनंतर सिनेविश्वातील अनेक सेलिब्रिटींना धक्का बसला होता.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Jiah khan : 'सूरज माझ्या मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता'; जिया खानच्या आईनं न्यायालयात दिली माहिती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Harsha Richhariya Sanyas Story: बस कंडक्टरची मुलगी ते 'स्वामी हर्षानंद गिरी'; 32व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलकडून स्वतःचंच पिंडदान, मग घेतली संन्यासाची दीक्षा
बस कंडक्टरची मुलगी ते 'स्वामी हर्षानंद गिरी'; 32व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलकडून स्वतःचंच पिंडदान, मग घेतली संन्यासाची दीक्षा
Atlee Kumar: मुलगी झाली हो! 'जवान' चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या घरात हलला पाळणा, दुसऱ्यांदा झाले वडील
मुलगी झाली हो! 'जवान' चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या घरात हलला पाळणा, दुसऱ्यांदा झाले वडील
Bhoot Bangla: जगभरात गाजतोय अक्षय कुमारचा 'भूत बंगला', फक्त 4 दिवसांतच 100 कोटी पार; 'धुरंधर 2' लाही पछाडणार?
जगभरात गाजतोय अक्षय कुमारचा 'भूत बंगला', फक्त 4 दिवसांतच 100 कोटी पार; 'धुरंधर 2' लाही पछाडणार?
Kedar Shinde, Gana Dhaav Re: केदार शिंदे यांची श्रद्धा, अध्यात्म आणि मानवी भावनांना स्पर्श करणारा नवा सिनेमा; नाव केलं जाहीर
केदार शिंदे यांची श्रद्धा, अध्यात्म आणि मानवी भावनांना स्पर्श करणारा नवा सिनेमा; नाव केलं जाहीर

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News : लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट
Dharashiv : धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
Raja Shivaji Movie: राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
Pahalgam Attack Adil Shah House Eknath Shinde: पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलं, एकनाथ शिंदेंचा फोटो देवासारखा भिंतीवर लावला!
पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिलं, एकनाथ शिंदेंचा फोटो देवासारखा भिंतीवर लावला!
तुमच्या मुलीसोबत लग्न लाऊन द्या, अन्यथा वडिलांना जीवे मारेन; बीडमधील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल
तुमच्या मुलीसोबत लग्न लाऊन द्या, अन्यथा वडिलांना जीवे मारेन; बीडमधील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल
Embed widget