Jahnavi Kapoor | जान्हवी कपूरचं नववधू अंदाजात फोटोशूट; ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर व्हायरल
जान्हवीने आपल्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ने काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये जान्हवी नववधू लूकमध्ये दिसत आहे. चौफेर सूर्यफुलं पसरली असून त्यामध्ये जान्हवीचं खास फोटोशूट करण्यात आलं आहे. जान्हवी कपूरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जान्हवी कपूरच्या या व्हिडीओवर चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहे. जान्हवी कपूर नववधू अंदाजात खूपच सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये जान्हवीने पिंक कलरचा ब्राइडल लेहंगा वेअर केला आहे. त्याचसोबत तिने ऑफ शोल्डर ब्लाउज, ग्रीन आणि व्हाइट कुंदन नेकलेस वेअर केला आहे. सुर्यफुलांमध्ये जान्हवीने आपलं फोटोशूट केलं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते. दरम्यान, जान्हवी कपूरने हे फोटोशूट ब्राइड्स टुडे मॅगझिनसाठी केलं आहे. त्याचसोबत जान्हवी कपूरचे फोटो आणि इतर डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
जान्हवीचं मुंबईत कोट्यवधींचं घर
अशातच जान्हवीने मुंबईत स्वतःचं एक घर घेतलं असल्याचीही माहिती मिळत आहे. गेल्या महिन्यात मुंबईत जान्हवीने कोट्यवधी रुपयांचे नवीन घर विकत घेतल्याची बातमी समोर आली आहे. जान्हवीचं हे घर जुहू परिसरातील एका इमारतीत 14, 15 आणि 16 व्या मजल्यावर आहे. जान्हवीने गेल्या वर्षी 7 डिसेंबरला हा करार केला होता. विशेष म्हणजे जान्हवीच्या या नवीन घराची किंमत जवळपास 39 कोटी रुपये इतकी असून तिने 78 लाख रुपयांचं मुद्रांक शुल्कही भरलं आहे.
जान्हवीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर चित्रपट गुंजन सक्सेनामध्ये जान्हवी सर्वात शेवटी दिसून आली होती. या चित्रपटात जान्हवी कपूरचे वडीलांची भूमिका पंकज त्रिपाठी यांनी साकारली होती. या चित्रपटाचं कथानक भारताची पहिली महिला पायलट गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारित होतं. त्याचसोबत जान्हवी कपूर करण जौहरचा आगामी चित्रपट तख्तमध्ये दिसून येणार आहे. जान्हवी कपूरने धडक चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. चित्रपटात तिने इशान खट्टरसोबत स्क्रिन शेअर केली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
