Actress Divyanka Tripathi and Vivek Dahiya Robbed : पासपोर्टसह महागड्या वस्तूंवर डल्ला; अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीला फॉरेन ट्रिपवर धक्कादायक अनुभव, नेमकं काय घडलं?
Actress Divyanka Tripathi and Vivek Dahiya Robbed : लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा करण्यासाठी रोमँटिक युरोप टूरवर गेलेल्या दिव्यांका आणि विवेक यांना चोरांमुळे मोठा फटका बसला आहे.
Actress Divyanka Tripathi and Vivek Dahiya Robbed : अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) आणि तिचा पती विवेक दहिया (Vivek Dahiya) हे आपल्या लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा करण्यासाठी रोमँटिक युरोप टूरवर गेले. पण, त्यांना आता या टूर दरम्यान वाईट अनुभव आला आहे. इटलीतील एका शहरात पासपोर्टसह महागड्या वस्तूंवर चोरांनी डल्ला मारला आहे. या प्रकरणी पोलिसांनी देखील हतबलता दाखवली असल्याचा आरोप दिव्यांकाने केला आहे.
'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना दिव्यांकाने सांगितले की, ते फ्लॉरेन्सला पोहोचले होते. या शहरात पर्यटनासाठी आम्ही उत्सुक होतो. पण, चोरांनी आमचे सगळं सामान चोरी केले असल्याचे दिव्यांकाने सांगितले.
View this post on Instagram
कारमधून चोरले सामान...
दिव्यांकाचा पती विवेक दहियाने सांगितले की,'या प्रवासात ही घटना वगळता सर्व काही अप्रतिम होते. आम्ही काल फ्लॉरेन्सला पोहोचलो आणि एक दिवस राहण्याचा बेत केला. आम्ही आमच्या मुक्कामासाठी एका हॉटेलजवळ गेलो आणि आमचे सर्व सामान बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये ठेवले होते. पण जेव्हा आम्ही आमचे सामान घेण्यासाठी कार जवळ आलो तेव्हा आमची कार फोडली असल्याचे लक्षात आले. या कारमधून आमचा पासपोर्ट, पर्स, खरेदी केलेल्या वस्तू, महागड्या मौल्यवान वस्तू गायब झाले असल्याचे त्यांनी सांगितले. चांगली गोष्ट म्हणजे चोरांनी आमचे काही जुने कपडे आणि खाद्यपदार्थ कारमध्ये तसेच ठेवले असल्याचे विवेक दहियाने सांगितले.
पोलिसांनी हात झटकले...
कारमधील वस्तूंची चोरी झाल्याचे समजताच आम्हाला कोणतीच मदत मिळाली नसल्याचे या सेलिब्रिटी कपलने सांगितले. चोरी झालेल्या भागात सीसीटीव्ही नसल्याने आम्ही मदत करू शकणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले असल्याचे दिव्यांका-विजयने सांगितले. त्यानंतर या सेलेब्स कपलने दूतावासाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यावेळी दूतावास कार्यालय बंद झाले होते.
पैसे नाही, पासपोर्ट नाही...मदतीसाठी विनंती
सध्या दिव्यांका आणि विजय हे फ्लोरेन्स जवळील एका हॉटेलमध्ये थांबले असून त्यांना हॉटेलचा स्टाफ मदत करत आहे. सध्या या दोघांकडे पैसे नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. पैसे, पासपोर्टची चोरी झाल्याने वाईट पद्धतीने हे जोडपं फसले असून दूतावासाकडून मदतीची अपेक्षा आहे.