एक्स्प्लोर
राज ठाकरेंचा निकटवर्तीय असल्याचं सांगत लैंगिक शोषण, अभिनेत्रीचा आरोप
मुंबई : राज ठाकरेंसोबतचे फोटो दाखवून आणि मनसेचा पदाधिकारी असल्याचं सांगत एका व्यक्तीने अपहरण आणि बलात्कार केल्याचा आरोप मुंबईतील एका अभिनेत्री आणि मॉडेल केला आहे. या अभिनेत्रीने काही हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केलं आहे.
अभिनेत्रीच्या आरोपानुसार, "निर्माता असल्याची बतावणी करणाऱ्या अल्ताफ मर्चंटने सुरुवातीला बॉलिवूडमध्ये काम देण्याचं आमिष दाखवलं. त्यानंतर राज ठाकरे यांच्यासोबतचा फोटो दाखवला आणि मनसेचा सदस्य असल्याचं सांगितलं. त्याने मला ड्रग्जचं व्यसन लावलं. स्वत:च्या घरात कैद करुन माझ्यावर बलात्कार केला."
"अल्ताफ मर्चंटने त्याच्या राजकीय वजनाचा आणि राज ठाकरेंशी थेट संबंधांचा हवाला देऊन मला आपल्या जाळ्यात फसवलं. त्यानंतर सिनेमात काम देण्याचं आमिष दिलं. यादरम्यान त्याने मला ड्रग्जचं व्यसनही लावलं. इतकंच नाही तर त्याच्या घरात कैद करुन माझ्यावर बलात्कार केला," असा आरोप अभिनेत्रीने केला आहे
याआधीही अनेक मुलींना फसवलं : अभिनेत्री
अल्ताफ मर्चंटने याआधीही त्याच्या राजकीय संबंधाचा हवाला देत अनेक मुलींना फसवलं आहे. तो मुलींना ड्रग्जचं व्यसन लावतो. त्यानंतर त्यांच्या आयुष्य उद्ध्वस्त करतो, असा दावाही अभिनेत्रीने केला आहे. अल्ताफच्या घरी एकटी असताना तेव्हा तिने अनेक मुलींचं सामान आणि कपडे पाहिले. त्यानंतर अल्ताफवर संशय आल्याने मी तिथून पळ काढला, असंही तिने सांगितलं.
व्यसन सोडवण्यासाठी रिहॅब सेंटरमध्ये उपचार
ड्रग्जचं व्यसन सोडवण्यासाठी ही अभिनेत्री देहरादूनला गेली होती. तिथे रिहॅब सेंटरमध्ये उपचार घेतल्यानंतर ती मुंबईत परतली. अल्ताफचा खरा चेहरा समोर आणण्याचं तिने ठरवलं होतं. तिने 14 मे 2016 रोजी अल्ताफ मर्चंटविरोधात मुंबईतील वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.
अल्ताफ मर्चंटच्या राजकीय वजनामुळे पोलिसांनी त्याला अद्याप अटक केलेली नाही, असा आरोप अभिनेत्रीने केला आहे. तर दुसरीकडे अल्ताफने वांद्रे कोर्टत अंतरिम जामीनासाठी अर्जही दाखल केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement