एक्स्प्लोर
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विनोद खन्ना यांचा फोटो व्हायरल

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना आजारी आहेत. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे मागील आठवड्यात शुक्रवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतील गिरगावच्या एचएन रिलायन्स फाऊंडेशन अँड रिचर्स सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
परंतु यादरम्यानच त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली दिसत आहे.
विनोद खन्ना यांना काय झालंय?
काही वृत्तानुसार, विनोद खन्ना यांना ब्लॅडर कॅन्सर आहे. मात्र याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. "वडिलांची प्रकृती आता उत्तम असून त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल," असं विनोद खन्ना यांचा मुलगा राहुल खन्नाने सांगितलं.
"डॉक्टर आणि रुग्णालयाचा स्टाफचा मी आभारी आहे. त्यांनी वडिलांची अतिशय चांगली काळजी घेतली, असंही राहुल खन्ना म्हणाला. दुसरीकडे विनोद खन्ना यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असून त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळेल," असं रुग्णालयाने सांगितलं.
विनोद खन्ना यांचा बॉलिवूडमध्ये दबदबा
विनोद खन्ना यांनी 'मेरे अपने', 'कुर्बानी', 'पूरब और पश्चिम', 'रेशमा और शेरा', 'हाथ की सफाई', 'हेरा फेरी', 'मुकद्दर का सिकंदर' यांसारख्या शानदार सिनेमात काम केलं होतं. विनोद खन्ना यांनी करिअरची सुरुवात निगेटिव्ह भूमिकेने केली होती. नंतर ते हिरो बनले. विनोद खन्ना यांनी 1971 च्या 'हम तुम और वो' मध्ये प्रमुख भूमिका साकारली.
राजकारणातही सक्रीय
विनोद खन्ना यांनी राजकीय क्षेत्रातही नशीब अवलंबलं. सध्या ते पंजाबच्या गुरदासपूर मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
