Urfi Javed : उर्फी जावेदच्या जन्मामुळे वडील होते नाराज; स्वत:च सांगितली कहाणी
उर्फी जावेदने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी कायमच खुल्यापणाने सांगितल्या आहेत. उर्फीचा जन्म झाल्यानंतर मुलगी झाली म्हणून तिचे वडील कसे दु:खी होते याबाबत तिने स्वत:च सांगितले आहे.
Urfi Javed : सोशल मीडियावर सतत चर्चेत असणारी अभिनेत्री उर्फी जावेदने आपल्या पाच वर्षाच्या करियरमध्ये अनेक अडथळ्यांचा सामना केला आहे हे सर्वांनाच माहित आहे. परंतु, तिचे बालपणही खूप कठीण गेले आहे. उर्फीच्या हातून लहानपणी घडलेल्या एका चुकीमुळे तिला कुटुंबातील सर्व सदस्य पॉर्नस्टार म्हणून चिडवड होते. उर्फीने स्वत: याबाबत माहिती दिली आहे.
उर्फीने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी कायमच खुल्यापणाने सांगितल्या आहेत. उर्फीचा जन्म झाल्यानंतर मुलगी झाली म्हणून तिचे वडील कसे दु:खी होते याबाबत तिने स्वत:च सांगितले आहे. शिवाय एका अपघातामुळे तिचे कुटुंबीयही कसे शत्रू झाले? याची माहिती उर्फीने एका मुलाखतीमध्ये दिली आहे.
उर्फीने सांगते, "एकदा माझी काही छायाचित्रे एका वेबसाईटवर लीक झाली होती. त्यावेळी मी अकरावीत होते. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. माझे कुटुंबीयही मला साथ देत नव्हते. माझ्या घरातील लोकांनी माझ्यावर आरोप केले, पण मी निर्दोष होते. माझे नातेवाईक मला पॉर्नस्टार म्हणू लागले. माझ्याकडे करोडो रुपये आहेत असे त्यांना वाटायचे. माझ्या वडिलांनी दोन वर्षे माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला. मला माझे नावही आठवत नव्हते, सगळे मला इतके घाणेरडे हाक मारायचे, कोणत्याही मुलीला या परिस्थितीचा सामना करावा लागून नये जो मी केला आहे."
"मला माझ्या घरात बोलू दिलं जात नव्हतं. मला नेहमीच सांगण्यात आलं की, मुलींनी बोलायचं नसतं, फक्त पुरुषच स्वतःचे निर्णय घेऊ शकतात. मी माझा शब्द पाळू शकेन हे मला माहीत नव्हते. मी माझे घर सोडल्यानंतरही मला चांगले आयुष्य जगायला खूप वेळ लागला. आता माझे व्यक्तिमत्व उघडपणे समोर येत आहे, मी आता अजिबात थांबणार नाही, असे उर्फी सांगते.
महत्वाच्या बातम्या