सलमान खानच्या ड्रायव्हरसह स्टाफ मेंबर्सना कोरोनाची लागण; भाईजान सेल्फ क्वॉरंटाईन
बॉलिवूडचा दंबंग सलमान खानच्या ड्रायव्हरसह दोन स्टाफ मेंबर्सनाही कोरोनाची लागण झाली आहे. असं सांगण्यात येत आहे की, ड्रायव्हर अशोकला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर अभिनेता सलमान खानने (Salman Khan) स्वतःला क्वॉरंटाईन केलं आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसने अख्ख्या जगाला विळखा घातला आहे. संपूर्ण जगभरात लाखो लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. अशातच भारतातही कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या विळख्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही अडकले होते. अशातच बॉलिवूडचा दंबंग सलमान खानच्या ड्रायव्हरसह दोन स्टाफ मेंबर्सनाही कोरोनाची लागण झाली आहे. असं सांगण्यात येत आहे की, ड्रायव्हर अशोकला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर अभिनेता सलमान खानने (Salman Khan) स्वतःला क्वॉरंटाईन केलं आहे.
सलमान खान (Salman Khan) आता 14 दिवसांसाठी क्वॉरंटाईन राहणार आहे, असं वृत्त पिंकविलाने दिलं आहे. असं सांगण्यात येत आहे की, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्यासाठी सांगितलं आहे. तसेच सलमानचा ड्रायव्हर आणि इतर स्टाफ मेंबर्स ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, सलीम खान आणि सलमा खान यांच्या वेडिंग अॅनवर्सरीचं सेलिब्रेशनही रद्द करण्यात आलं आहे.
सलमान खान बिग बॉस-14 या शोचं सूत्रसंचलन करत होता. अशातच आता बिग बॉसच्या येणाऱ्या एपिसोडसाठी सलमान हजेरी लावणार का? यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तसेच सलमान खानने त्याचा आगामी चित्रपट राधेची शुटींग सुरु केली आहे. या चित्रपटात सलमानसोबत दिशा पाटनीदेखील दिसून येणार आहे.
दरम्यान, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी गेल्या 2 ते 3 महिन्यांमध्ये शुटींगला सुरुवात केली आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊन या कारणांमुळे चित्रपटाच्या चित्रिकरणांवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर अनलॉकमध्ये चित्रिकरणास परवानगी देण्यात आली. दरम्यान, कोरोनाचं संकट अद्याप संपलेलं नाही. अशातच कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी जगभरातील अनेक शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :