Riteish Deshmukh : रितेश-जेनेलियाने बजावला मतदानाचा हक्क; लातूर लोकसभेसाठी केलं मतदान
Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री-निर्माती जेनेलिया डिसूझा यांनी लातूरमध्ये मतदानाचा अधिकार बजावला.

Riteish Deshmukh : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी अभिनेत्री-निर्माती जेनेलिया डिसूझा हे सिनेसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपं आहे. या दोघांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. या दोघांनी लातूर लोकसभा मतदारसंघासाठीा बाभुळगावमध्ये त्यांनी मतदान केले. मतदानानंतर रितेश देशमुखने ट्वीटवर फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोत रितेशसह जेनेलिया आणि रितेशच्या आई वैशाली देशमुखही
आज लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील 94 मतदारसंघात मतदान होत आहे. यामध्ये 10 राज्ये आणि एका केंद्रशासित राज्याचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 11 जागांवर आज मतदान होत आहे.
सोशल मीडियावर अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात जाताना दिसत आहेत. रितेश पांढऱ्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. त्याचवेळी जेनेलिया पिवळ्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती. दोघांनीदेखील सेलेब्स असल्याचे न दाखवता रांगेत उभे राहुन मतदान केले.
#WATCH | Maharashtra: Actor Riteish Deshmukh and his wife Genelia Deshmukh cast votes at a polling booth in Latur.
— ANI (@ANI) May 7, 2024
NDA has fielded sitting MP Sudhakar Tukaram Shrangare against INDIA Alliance's Kalge Shivaji Bandappa.#LokSabhaElections2024 pic.twitter.com/tP7DLeGjoJ
मतदानानंतर जेनेलिया आणि रितेश मतदान केंद्राबाहेर मीडियाशी बोलत होते. यावेळी दोघांनीही सर्वांना जाऊन मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी जेनेलिया डिसूझा म्हणाली, 'आज हा एक महत्त्वाचा दिवस आहे. मतदान महत्वाचे आहे. प्रत्येक नागरिकाने जाऊन मतदान करण्याचे आवाहन जेनेलियाने केले. अभिनेता रितेशने सांगितले की, मी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबईहून लातूरला आलो. सर्वांनी घरातून बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन रितेश देशमुखने केले.
We have voted, have you ? #Latur @geneliad pic.twitter.com/2sNUWzCK3L
— Riteish Deshmukh (@Riteishd) May 7, 2024
रितेश देशमुखचे आगामी चित्रपट कोणते?
रितेश देशमुख लवकरच हाऊसफुल 5, दिमाखीलाल, मस्ती 4, विस्फोट, काकुडा आदी चित्रपटांत झळकणार आहे. त्याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारीत राजा शिवाजी या चित्रपटात झळकणार आहे. त्याशिवाय, अजय देवगणसोबत 'रेड 2'या चित्रपटात झळकणार आहे. तर, जेनेलिया देशमुख आमिर खानसोबत 'सितारे जमीन पर' या चित्रपटात झळकणार आहे.
Riteish and Genelia Voting in Latur : रितेश आणि जेनेलिया देशमुख यांचं लातुरच्या बाभुळगावमध्ये मतदान
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
