एक्स्प्लोर

कॅन्सरच्या अफवांनंतर ऋषी कपूर यांचा व्हिडीओ समोर

व्हिडीओत ऋषी कपूर आणि अभिनेते अनुपम खेर न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.

मुंबई : अभिनेते ऋषी कपूर यांच्यावर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू आहेत. ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याचा अफवा काही दिवसांपूर्वी पसरल्या होत्या. त्यानंतर ऋषी कपूर यांचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे, ज्यामध्ये ऋषी कपूर आणि अभिनेते अनुपम खेर न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. अनुपम खेर यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

व्हिडीओ शेअर करताना अनुपम खेर यांनी म्हटलं की, "प्रिय ऋषी कपूर, मॅनहॅटनच्या रस्त्यांवर तुझ्यासोबत फिरण्याचा आणि तुझ्यासोबत वेळ घालवण्याचा अनुभव खास आहे. तुझ्यासोबत गप्पा मारताना मजा येते. ऋषी कपूर यांना भेटून खूप आनंद झाला."

ऋषी कपूर यांनीही आपल्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी लिहिलं की, 'खेर फ्री' की 'केअर फ्री' उपचारादरम्यान मित्र अनुपम खेरसोबत."

ऋषी कपूर यांना थर्ड स्टेजचा कॅन्सर झाल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र कुटुंबीयांनी ही अफवा असल्याचं स्पष्ट केलं. "ऋषी कपूर यांच्या चाचण्या व्हायच्या आहेत. त्यांना काय त्रास आहे आणि कोणत्या आजाराने ते त्रस्त आहेत, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. इतकंच नाही तर ऋषीलाही माहित नाही की त्याला काय झालंय. वैद्यकीय चाचण्यांच्या प्रक्रियेला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे त्यांना अॅडव्हान्स स्टेजचा कॅन्सर झाल्याचं अंदाज लोक कसा काय लावत आहेत? ऋषीच्या सगळ्या चाचण्या होऊ दे. रिपोर्ट आल्यावर आम्ही सर्वांना याची माहिती देऊ," असं रणधीर कपूर यांनी सांगितलं.

ऋषी कपूर यांच्या आई कृष्णा राज कपूर यांचं 1 ऑक्टोबरला निधन झालं. परंतु त्यांच्या अंत्यदर्शनालाही ऋषी कपूर, नितू कपूर आणि रणबीर कपूर उपस्थित नव्हते. यामुळेच ऋषी कपूर यांना ब्लड कॅन्सर असून लवकरच त्यांची किमोथेरपी सुरु होणार असल्याच्या अफवांनी जोर पडकला होता.

उपचारासाठी रवाना होण्याआधी ऋषी कपूर यांनी ट्वीट केलं होतं की, "मी कामातून छोटा ब्रेक घेऊन काही वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेला जात आहे. माझ्या शुभचिंतकांनी काळजी करु नये किंवा कोणतेही अंदाज लावू नये. अभिनेता म्हणून 45 वर्ष काम करताना माझ्या शरीराने बऱ्याच गोष्टी सहन केल्या आहे. तुमच्या प्रेम आणि शुभेच्छांनी मी लवकरच परत येईन."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chhaava 2 Vicky Kaushal As Shahu Maharaj: बॉक्स ऑफिस पुन्हा हादरणार, 'छावा'चा सीक्वेल येणार? शाहू महाराजांच्या भूमिकेत झळकणार विक्की कौशल
बॉक्स ऑफिस पुन्हा हादरणार, 'छावा'चा सीक्वेल येणार? शाहू महाराजांच्या भूमिकेत झळकणार विक्की कौशल
Director Ranjith: प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या अडचणीत वाढ, लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक; अभिनेत्री तक्रारीत काय म्हणाली?
प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या अडचणीत वाढ, लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक; अभिनेत्री तक्रारीत काय म्हणाली?
Farah Khan Cook: सेलिब्रिटीज ते नेते मंडळी; फराह खानच्या यूट्यूब व्हिडीओत दिसणारा कुक कोण? आता त्याची सॅलरीही वाढणार
सेलिब्रिटीज ते नेते मंडळी; फराह खानच्या यूट्यूब व्हिडीओत दिसणारा कुक कोण? आता त्याची सॅलरीही वाढणार
Raja Shivaji First Look: 'धुरंधर 2'मधल्या SP असलमला विसरुन जाल; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये संजय दत्तला पाहिलंत?
'धुरंधर 2'मधल्या SP असलमला विसरुन जाल; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये संजय दत्तला पाहिलंत?

व्हिडीओ

Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report
Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report
Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!
पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!
Solapur Crime news: सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
Latur Rain Update : लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Share Market : नव्या आर्थिक वर्षाची दणक्यात सुरुवात, शेअर बाजारात एका दिवसात गुंतवणूकदारांची 10 लाख कोटींची कमाई
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात 10 लाख कोटींची कमाई
Donald Trump : इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले  
इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Embed widget