रणवीर बनला 'लव्हगुरु', सारा-कार्तिकची भेट घडवली
सारा अली खान आपले वडील सैफ अली खान यांच्यासोबत 'कॉफी विथ करण 6' मध्ये आली होती. त्यावेळी मला अभिनेता कार्तिक आयर्नसोबत डेटवर जायचं आहे, असं सारानं बोलून दाखवलं होतं. साराची इच्छा गंभीरतेने घेत रणवीर सिंहने लवगुरुच्या भूमिकेत येत दोघांनी भेट घडवली आहे.

मुंबई : केदारनाथ आणि सिंबा सिनेमांमुळे सैफ अली खानची मुलगी सारा अली खानची सध्या सर्वत्र चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी साराने 'कॉफी विथ करण-6' मध्ये अभिनेता कार्तिक आर्यनसोबत डेटवर जाण्याची इच्छा बोलून दाखवली होती. साराची हीच इच्छा लक्षात ठेवून रणवीरने पुढाकार घेत सारा आणि कार्तिकचे भेट घडवून आणली आहे.
सारा अली खान आपले वडील सैफ अली खान यांच्यासोबत 'कॉफी विथ करण 6' मध्ये आली होती. त्यावेळी मला अभिनेता कार्तिक आयर्नसोबत डेटवर जायचं आहे, असं सारानं बोलून दाखवलं होतं. साराची इच्छा गंभीरतेने घेत रणवीर सिंहने लव्हगुरुच्या भूमिकेत येत दोघांनी भेट घडवली आहे.
एका कार्यक्रमादरम्यान दोघांची भेट झाली आहे. रणवीरने कार्तिकला शुभेच्छा देत कानात काहीतरी सांगितलं. त्यानंतर दोघांचे हात एकमेकांच्या हातात दिले. फायनली यू गाईज मेट, असं म्हणताना रणवीर दिसत आहे. असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रणवीर आणि सारा हे रोहित शेट्टीच्या 'सिंबा' सिनेमात एकत्र दिसणार आहेत. येत्या 28 डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सारा अली खानचं तिच्या केदारनाथ सिनेमातील आणि सिंबा सिनेमातील ट्रेलरमधील अभिनयामुळे सर्वांकडून कौतुक होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
