एक्स्प्लोर

अभिनेता प्रतीक बब्बरचा लखनौच्या तरुणीशी साखरपुडा?

22 जानेवारीला लखनौमध्ये प्रतीक आणि त्याची गर्लफ्रेण्ड सान्या सागर यांची एंगेजमेंट होणार असल्याचं वृत्त आहे

मुंबई : जानेवारी महिना बॉलिवूड सेलिब्रेटींच्या साखरपुड्याचा महिना आहे, असं म्हटलं तर वावगं ठरु नये. गेल्या महिन्यात विरानुष्काच्या लग्नाची लगबग संपते, तोच दीपिका-रणवीर एंगेजमेंट करणार असल्याच्या चर्चांना ऊत आला. त्यातच प्रसिद्ध अभिनेता प्रतीक बब्बरही साखरपुडा करण्याची शक्यता आहे. 22 जानेवारीला लखनौमध्ये प्रतीक आणि त्याची गर्लफ्रेण्ड सान्या सागर यांची एंगेजमेंट होणार असल्याचं वृत्त आहे. 31 वर्षांचा प्रतीक हा प्रख्यात अभिनेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा आहे.

'पाठकबाई' अक्षया आणि सुयश टिळकचा साखरपुडा?

8 वर्षांपासून प्रतीक आणि सान्या एकमेकांना ओळखतात, मात्र गेल्याच वर्षी ते रिलेशनशीपमध्ये अडकले. प्रतीक किंवा त्याच्या कुटुंबीयांनी अद्याप साखरपुड्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. साखरपुड्याची तारीख पुढे-मागे होण्याची शक्यता आहे. दोघांचे कुटुंबीय, मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. प्रतीक बब्बरने 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून 2008 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तो एक दिवाना था, धोबीघाट यासारख्या चित्रपटांमध्ये झळकला. बागी 2 चित्रपटातून तीन वर्षांनी तो पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अहमद खान यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात तो खलनायकाच्या व्यक्तिरेखेत आहे. टायगर श्रॉफ आणि दिशा पटाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

दीपिका पदुकोण-रणवीर सिंहचा 5 जानेवारीला साखरपुडा?

सान्याचा जन्म 1 मे 1990 रोजी लखनौमध्ये झाल्याची माहिती आहे. फॅशन कम्युनिकेशन या विषयात तिने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतून पदवी घेतली. सध्या ती सहाय्यक दिग्दर्शक म्हणून फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update: दरवर्षीपेक्षा राज्यात यंदा कमी प्रमाणात थंडी; शेतकर्‍यांनाही सतर्कतेचा इशारा, काय म्हणाले हवामान शास्त्रज्ञ?
दरवर्षीपेक्षा राज्यात यंदा कमी प्रमाणात थंडी; शेतकर्‍यांनाही सतर्कतेचा इशारा, काय म्हणाले हवामान शास्त्रज्ञ?
शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, संजय राऊतांचा दावा, आता शिवसेनेच्या नेत्यांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, संजय राऊतांचा दावा, आता शिवसेनेच्या नेत्यांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
हे जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र; शाहू महाराज भाजपवर संतापले, कोल्हापुरात आंदोलनात उतरले
हे जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र; शाहू महाराज भाजपवर संतापले, कोल्हापुरात आंदोलनात उतरले
Pakistani Shah Rukh Khan : पाकिस्तानचा 'शाहरुख खान' कोणाला समजंल जातं? भारतीय पुरस्कार जिंकणारा एकमेव अभिनेता!
पाकिस्तानचा 'शाहरुख खान' कोणाला समजंल जातं? भारतीय पुरस्कार जिंकणारा एकमेव अभिनेता!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Fadanvis On Eknath Shinde : गृहखात्याविषयी रस्सीखेच नव्हती, शिंदे नाराज नाहीत - फडणवीसUday Samant On Mahayuti : एकनाथ शिंदे आम्हाला अपेक्षित मंत्रिपदं देतील- उदय सामंतTop 50 News : बातम्यांचं अर्धशतक : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 03 Dec 2024 : 2 PmManoj Jarange on Maratha Reservation : 5 जानेवारीपर्यंत मागण्या मान्य करा अन्यथ, मनोज जरांगेंचा अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update: दरवर्षीपेक्षा राज्यात यंदा कमी प्रमाणात थंडी; शेतकर्‍यांनाही सतर्कतेचा इशारा, काय म्हणाले हवामान शास्त्रज्ञ?
दरवर्षीपेक्षा राज्यात यंदा कमी प्रमाणात थंडी; शेतकर्‍यांनाही सतर्कतेचा इशारा, काय म्हणाले हवामान शास्त्रज्ञ?
शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, संजय राऊतांचा दावा, आता शिवसेनेच्या नेत्यांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, संजय राऊतांचा दावा, आता शिवसेनेच्या नेत्यांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
हे जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र; शाहू महाराज भाजपवर संतापले, कोल्हापुरात आंदोलनात उतरले
हे जाणीवपूर्वक केलेले षडयंत्र; शाहू महाराज भाजपवर संतापले, कोल्हापुरात आंदोलनात उतरले
Pakistani Shah Rukh Khan : पाकिस्तानचा 'शाहरुख खान' कोणाला समजंल जातं? भारतीय पुरस्कार जिंकणारा एकमेव अभिनेता!
पाकिस्तानचा 'शाहरुख खान' कोणाला समजंल जातं? भारतीय पुरस्कार जिंकणारा एकमेव अभिनेता!
Ind vs Aus : टीम इंडिया संकटात! कर्णधार रोहित शर्माचा निर्णय ठरला चुकीचा, 2193 दिवसांनी सहाव्या क्रमांकावर आला, पण...
टीम इंडिया संकटात! कर्णधार रोहित शर्माचा निर्णय ठरला चुकीचा, 2193 दिवसांनी सहाव्या क्रमांकावर आला, पण...
विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांनी घेतली शपथ; विशेष अधिवेशनापूर्वीच कालिदास कोळंबकरांना मोठी जबाबदारी
विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांनी घेतली शपथ; विशेष अधिवेशनापूर्वीच कालिदास कोळंबकरांना मोठी जबाबदारी
Kaun Banega Crorepati 16 : बोनी कपूरांचं खरं नाव माहीत आहे का? केबीसी कंटेस्टेंटला उत्तर आलं नाही, ऑडियन्स पोल घेतलात, तर तिथंही उत्तर चुकलं!
Video : बोनी कपूरांचं खरं नाव माहीत आहे का? केबीसी कंटेस्टेंटला उत्तर आलं नाही, ऑडियन्स पोल घेतलात, तर तिथंही उत्तर चुकलं!
महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला पण आमचं ठरलं होतं, संजय राऊतांना कवडीची किंमत नाही, संजय शिरसाटांचा हल्लाबोल
महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला पण आमचं ठरलं होतं, संजय राऊतांना कवडीची किंमत नाही, संजय शिरसाटांचा हल्लाबोल
Embed widget