(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अभिनेते मोहन जोशी कोरोना पॉझिटिव्ह, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही लागण
अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण झाली आहे. गोव्यात ते अगंबाई सूनबाई मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. या दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबई : मराठी चित्रपट, मालिका यासह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर सध्या ते गोव्याच्या एका हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन आहेत. मोहन जोशी यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबईमध्ये लॉकडाऊन असल्याने मोहन जोशी गेल्या काही दिवसांपासून लोकप्रिय मालिका 'अगंबाई सूनबाई' शूटिंगनिमित्त गोव्यात होते. या दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:ला हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन करुन घेतलं आहे, जेथे ते शूटिंगदरम्यान राहत होते. अगंबाई सूनबाई मालिकेच्या सेटवरील इतर चार सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये दोन लाईटमॅन, आर्ट डिपार्टमेंटमधील एक व्यक्ती आणि एक ड्राइव्हर यांचा समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
कोरोनाबाधितांसाठी अमिताभ बच्चन सरसावले, दिल्लीतील कोविड सेंटरच्या निर्माणासाठी 2 कोटींचं योगदान
गोव्यातून मोहन जोशी यांनी फोनवर एबीपी न्यूजशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी माहिती दिली की, यापूर्वीच कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मी कोरोना लसीचा पहिला डोस 6 मार्च आणि दुसरा डोस 20 एप्रिल रोजी घेतला होता, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली.
कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स, सरकारचा निर्णय
मोहन जोशी यांनी सांगितलं की, माझी तब्येत ठणठणीत आहे. काळजी करण्याचं कारण नाही. आधीपेक्षा माझी प्रकृती उत्तम आहे आणि आता सात दिवसांनंतर होणाऱ्या कोरोना चाचणीची मी वाट पाहत आहे. कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच मी गोव्याहून मुंबईत परतू शकणार आहे.
कोरोना योद्ध्यांची मृत्यूनंतरही परवड, केवळ 27 टक्के कुटुंबांनाच 50 लाखांच्या विमा योजनेचा लाभ
मोहन जोशी यांनी 90 च्या दशकात भूकंप , मृत्यूदंड, गंगाजल, अंत , ऐलान, आंदोलन, गदर , हम दोनो, गुंडाराज, 'वास्तव', हसिना मान जायेगी, लाल बादशाह, होगी प्यार की जीत, बिच्छू, बेटी नंबर 1', जमीन, गर्व-द प्राइ़ड, बागबान, शिवा का इंसाफ अशा अनेक बिग बजेट सिनेमांमध्ये काम केलं आहे.