एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डेटिंग, लिव्ह इन आणि 8 वर्षांचा संसार, अभिनेता इम्रान खान घटस्फोटाच्या मार्गावर
इम्रान खानची पत्नी अवंतिकाने काही दिवसांपूर्वीच मुलगी इमारासोबत त्यांचं 'पाली हिल'मधील घर सोडलं. सध्या ती माहेरी राहत असल्याची माहिती आहे.
मुंबई : बॉलिवूडमधील आणखी एक सेलिब्रेटी जोडपं घटस्फोटाच्या मार्गावर आहे. प्रसिद्ध अभिनेता आमीर खानचा भाचा आणि 'जाने तू या जाने ना' यासारख्या चित्रपटात झळकलेला अभिनेता इम्रान खान काडीमोड घेणार असल्याची माहिती आहे. आठ वर्षांच्या संसारानंतर इम्रान पत्नी अवंतिका मलिकपासून विभक्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
दोघांमधील तीव्र मतभेदामुळे आम्ही आमच्या नात्याला विराम देण्याचा निर्णय घेतला आहे, असं अवंतिकाने सांगितल्याचं 'डीएनए' वृत्तपत्रातील रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. अवंतिकाने काही दिवसांपूर्वीच मुलगी इमारासोबत इम्रानचं 'पाली हिल'मधील घर सोडलं. सध्या ती माहेरी राहत असल्याची माहिती आहे. परंतु दोघांनीही अद्याप घटस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
इम्रान आणि अवंतिका यांची वयाच्या 19 व्या वर्षी भेट झाली होती. काही वर्ष डेटिंग केल्यानंतर दोघं लॉस अँजेलसमध्ये लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. दहा वर्षांच्या ओळखीनंतर 2011 मध्ये ते विवाहबंधनात अडकले. 2014 त्यांच्या मुलीचा जन्म झाला. तिचं नामकरण इमारा मलिक खान असं करण्यात आलं.
पत्नीचं परपुरुषांशी अश्लील चॅट, पतीची घटस्फोटासाठी धाव
इम्रान आणि अवंतिका यांनी कोर्ट मॅरेज केलं होतं. 'मी मुस्लिम आहे, तर अवंतिका हिंदू कुटुंबातील आहे. त्यामुळे एका धर्माचे रितीरिवाज पाळून लग्न करण्याचं मला वैयक्तिकरित्या पटत नव्हतं. त्यामुळे न्यूट्रल म्हणून मी कोर्ट मॅरेजचा पर्याय निवडला' असं इम्रान म्हणाला होता.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इम्रानच्या बालपणीच त्याच्या आई-वडिलांचाही घटस्फोट झाला होता. त्यानंतर इम्रानच्या आईने अभिनेता राज झुत्शीसोबत विवाह केला.
36 वर्षीय इम्रान खानने जो जिता वही सिकंदर, कयामत से कयामत तक यासारख्या चित्रपटांमध्ये बाल कलाकार म्हणून काम केलं. 2008 मध्ये त्याने 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पाय ठेवला. त्यानंतर किडनॅप, लक, देल्ही बेल्ली यासारख्या सिनेमात तो झळकला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement