एक्स्प्लोर
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार लीलावती रुग्णालयात दाखल
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईच्या लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईच्या लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. किडनीच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या उपचार सुरू आहेत.
लीलावती रुग्णालयातील एका डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या त्यांच्या वेगवेगळ्या चाचण्या सुरु असून त्यानुसार पुढील उपचार करण्यात येणार आहे.
दरम्यान, याआधी त्यांना डिसेंबर 2016मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा त्यांच्या डाव पायाला बरीच सूज आली होती. त्यावर उपचारही करण्यात आले होते.
1991 साली दिलीप कुमार यांना पद्मभूषण आणि 2015 साली पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. 1950 ते 1960 दरम्यान, त्यांनी आन, दाग, देवदास, मधुमति, पैगाम, मुगले आजम, राम और श्याम यासारखे एकाहून एक दर्जेदार सिनेमे केले होते.
जवळजवळ सहा दशकं सिनेक्षेत्रात काम केल्यानंतर दिलीप कुमार यांनी 1998 साली बॉलिवूडला अलविदा केला. 'किला' हा त्यांचा शेवटचा सिनेमा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement