एक्स्प्लोर
आमचं मौन जगभर पसरेल, अनुपम खेर यांचा कवितेतून आक्रोश
नवी दिल्ली : काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाला 27 वर्ष पूर्ण झाल्यानं प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांनी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. काश्मिरी पंडितांच्या अस्तित्वाची दखल घ्या आणि त्यांचा आवाज ऐका, असा संदेश कवितेतून दिला आहे.
'27 वर्ष झाली, पण आम्ही काश्मिरी पंडित अजूनही आमच्याच देशात निर्वासित आहोत. त्यांच्या मूक आक्रोशाचा निषेध करणारी कविता. नक्की शेअर करा' असं खेर यांनी ट्वीट करताना म्हटलं आहे. यासोबत अनुपम खेर यांनी व्हिडिओ शेअर केला आहे.
https://twitter.com/AnupamPkher/status/821914705103122432
अनुपम खेर स्वतः काश्मिरी ब्राम्हण आहेत. त्यामुळे हा आवाज आणखी दाबून ठेवता येणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. ज्याप्रमाणे समुद्रात मीठ मिसळतं, त्याप्रमाणे आमची शांतता जगभरात पसरेल. आमच्या घरात आमच्यावर होणाऱ्य़ा अन्यायासाठी आम्ही उत्तर मागू' असं पुढे म्हटलं आहे. काश्मिरी कवी डॉ. शशी शेखर तोष्कानी यांच्या लेखणीतून ही कविता उतरली आहे.
कुठलाही काश्मिरी पंडित आजचा दिवस विसरु शकणार नाही. 'काश्मिरी पंडितांनो, तुमचं घर सोडा, बाहेर जा' अशा घोषणा मशिदीतून होत होत्या. ती रात्र आमच्या काश्मिरी पंडित मित्र आणि नातेवाईकांना कधीच विसरता येणार नाही, असं अनुपम खेर यांनी 'एएनआय'ला सांगितलं.
‘दंगल’ फेम जायरा वसीम वादात, सोशल मीडियावरुन माफीनामा
दंगल फेम अभिनेत्री जायरा वासीमने नुकतीच जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतली. यानंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आलं. यानंतर जायराने या भेटीबाबत फेसबुकवर जाहीर माफीही मागितली.रील लाईफ वडील जायराच्या पाठीशी, पत्रकाद्वारे आमीरचं समर्थन
जायराने मेहबुबा मुफ्ती यांची भेट घेतली. या भेटीत जायरा वसीम ही काश्मीरी तरुणांसाठी रोल मॉडेल असल्याचं मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या. ज्यांच्यामुळे काश्मीर अस्थिर बनलंय, त्या मुफ्तींशी जायराने भेट घेतल्याची टीका काश्मीर खोऱ्यातील कट्टरपंथींनी जायरावर केली. नेटिझन्सनी सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
राजकारण
विश्व
Advertisement