Akshay And Emraan In Mumbai Metro: मुंबई मेट्रोमध्ये अक्षय आणि इमराननं केला प्रवास; ‘मैं खिलाडी, तू अनाडी’ गाण्यावर केला डान्स
सध्या अक्षय (Akshay Kumar) आणि इमरान (Emraan Hashmi) हे सेल्फी (Selfiee) या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. नुकताच त्यांचा मुंबई मेट्रोमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
![Akshay And Emraan In Mumbai Metro: मुंबई मेट्रोमध्ये अक्षय आणि इमराननं केला प्रवास; ‘मैं खिलाडी, तू अनाडी’ गाण्यावर केला डान्स actor akshay kumar and emraan hashmi surprise fans in Mumbai metro Akshay And Emraan In Mumbai Metro: मुंबई मेट्रोमध्ये अक्षय आणि इमराननं केला प्रवास; ‘मैं खिलाडी, तू अनाडी’ गाण्यावर केला डान्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/16/8c1110670606a5b39c67e8bf843611bc1676545452019259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Akshay And Emraan In Mumbai Metro: बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असणारा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) यांचा सेल्फी (Selfiee) हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. तसेच या चित्रपटामधील 'कुडीये नी तेरी' हे गाणं देखील रिलीज झाले होते. सध्या अक्षय आणि इमरान हे या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. अनेक कलाकार त्यांच्या चित्रपटाचे हटक्या पद्धतीनं प्रमोशन करत असतात. आता सेल्फी या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी अक्षय आणि इमराननं मुंबई मेट्रोमधून (Mumbai Metro) प्रवास केला आहे. हा प्रवास करताना त्यांनी ‘मैं खिलाडी, तू अनाडी’ या गाण्यावर डान्स देखील केला. नुकताच त्यांचा मुंबई मेट्रोमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
डी एन नगर मेट्रो स्टेशनवर थांबलेल्या मेट्रोमध्ये इमरान आणि अक्षय हे दोघे चढले. मेट्रोमध्ये असताना त्यांनी मास्क परिधान केला होता. त्यामुळे मेट्रोमधील लोक त्यांना ओळखू शकले नाहीत. त्यानंतर मेट्रोमध्ये असतानाच त्या दोघांनी मास्क काढला आणि ‘मैं खिलाडी, तू अनाडी’ या गाण्यावर डान्स केला. त्यानंतर अक्षय आणि इमरान यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी मेट्रोमधील प्रवाशांनी गर्दी केली.
पाहा व्हिडीओ
View this post on Instagram
'या' दिवशी सेल्फी येणार प्रेक्षकांच्या भेटीस
24 फेब्रुवारी रोजी अक्षय आणि इमरान यांचा सेल्फी हा चित्रपट रिलीज होणार आहे. 'गुड न्यूज' चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. सेल्फी या चित्रपटाची करण जोहरनं निर्मिती केली आहे. सेल्फी या चित्रपटात अॅक्शन, ड्रामा आणि कॉमेडीचा तडका बघायला मिळणार आहे. सेल्फी या चित्रपटात अक्षय आणि इमरान यांच्यासोबतच अभिनेत्री मृणाल ठाकूर, नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) या देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
सेल्फीबरोबरच अक्षयचे काही चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 'वेडात मराठे, वीर दौडले सात' या चित्रपटात देखील अक्षय कुमार काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)