Selfiee Song Kudiyee Ni Teri Teaser: अक्षयचे सिक्स पॅक्स अन् मृणालचा ग्लॅमरस अंदाज; 'सेल्फी' मधील गाण्याचा टीझर रिलीज
सेल्फी (Selfiee) या चित्रपटामधील 'कुडीये नी तेरी' (Kudiyee Ni Teri) या गाण्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
![Selfiee Song Kudiyee Ni Teri Teaser: अक्षयचे सिक्स पॅक्स अन् मृणालचा ग्लॅमरस अंदाज; 'सेल्फी' मधील गाण्याचा टीझर रिलीज Selfiee song Kudiyee Ni Teri teaser release Akshay Kumar flaunts six pack abs dances with Mrunal Thakur Selfiee Song Kudiyee Ni Teri Teaser: अक्षयचे सिक्स पॅक्स अन् मृणालचा ग्लॅमरस अंदाज; 'सेल्फी' मधील गाण्याचा टीझर रिलीज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/95afc23f47c4f79a48d66bdce6fc8d171675763483446259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Selfiee song Kudiyee Ni Teri teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्याचा सेल्फी (Selfiee) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील 'कुडीये नी तेरी' (Kudiyee Ni Teri) या गाण्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 'कुडीये नी तेरी' गाण्याचा 17 सेकंदाचा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अक्षय आणि मृणालची रोमँटिक केमिस्ट्री
'कुडीये नी तेरी' गाण्याच्या टीझरमध्ये अक्षय आणि मृणाल ठाकूरची रोमँटिक केमिस्ट्री दिसत आहे. या टीझरमध्ये अक्षयच्या सिक्स पॅक्स अॅब्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. तर गाण्याच्या टीझरमधील मृणालचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. अक्षयनं 'कुडीये नी तेरी' गाण्याचा टीझर सोशल मीडियावर शेअर करुन लिहिलं, 'रेडी टू रॉक विथ 'कुडीये नी तेरी'? गाणं 9 फेब्रुवारी रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीस.' अक्षयनं शेअर केलेल्या गाण्याच्या टीझरवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. या टीझरला एका यूझरनं कमेंट केली, 'खिलाडी इज बॅक' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट करत लिहिलं, 'चांगलं गाणं आहे.'
पाहा 'कुडीये नी तेरी' चा टीझर:
View this post on Instagram
सेल्फी चित्रपटाची स्टार कास्ट
सेल्फी या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि मृणाल ठाकूर यांच्यासोबतच इमरान हाश्मी (Emraan Hashmi), नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. सेल्फी हा चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'गुड न्यूज' चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अक्षयच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
सेल्फी या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटामध्ये अॅक्शन, ड्रामा आणि कॉमेडीचा तडका प्रेक्षकांना पहायला मिळेल, असा अंदाज चित्रपटाच्या ट्रेलरमधून लावला जाऊ शकतो. सेल्फी या चित्रपटाची करण जोहरनं निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Selfiee Trailer: फॅन, सुपरस्टार आणि 'सेल्फी'ची गोष्ट; अक्षय आणि इमरानच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)