(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amitabh Bachchan, Abhishek Bachchan : 'रोजच्या जेवणासाठी स्टाफकडून पैसे घेत होते बिग बी'; आर्थिक संकटाबाबत अभिषेकने सांगितली आठवण
Amitabh Bachchan, Abhishek Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते.
Amitabh Bachchan, Abhishek Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. अमिताभ यांचा मुलगा अभिषेक बच्चनचा (Abhishek Bachchan) बॉब बिस्वास (bob biswas) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटातील अभिषेकच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. एका मुलाखतीमध्ये अभिषेकने आर्थिक संकटाबाबत सांगितले होते.
अभिषेकने मुलाखतीमध्ये सांगितले, 'मी बोस्टनमध्ये शिक्षणासाठी गेलो होतो. तेव्हा मी माझ्या वडीलांसोबत अनेक वेळा गप्पा मारत होते. आमचे कुटुंब तेव्हा आर्थिक संकटाचा सामना करत होते. एकीकडे मी बोस्टनच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतो. तर दुसरीकडे, रोज कुटुंबाला जेवणासाठी पैसे कोणाकडून आणायचे ? याचा विचार माझे वडील करत होते. ते अनेक वेळा स्टाफकडून पैसे घेऊन जेवण आणत असत. माझे कुटुंब आर्थिक अडचणीत असताना मी बोस्टनमध्ये राहणं मला योग्य वाटलं नाही. मी माझ्या वडीलांना सांगितले की मी इथले शिक्षण सोडून माझ्या कुटुंबाला सपोर्ट करण्यासाठी मुंबईमध्ये येत आहे. '
View this post on Instagram
जेव्हा अमिताभ यांना चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हते
‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये अमिताभ यांनी सांगितले होते, '21 वर्ष झाली आहे. 2000 मध्ये मी या शोचे सूत्रसंचालन करण्यास सुरूवात केली. तेव्हा अनेक जण असे म्हणत होते की चित्रपटांमधून अमिताभ टेलिव्हीजनमध्ये जात आहेत. यामुळे त्यांच्या इमेजवर वाईट परिणाम होऊ शकतो. पण त्यावेळी मला चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हते. पण नंतर जेव्हा या शोचा एपिसोड प्रदर्शित झाला. तेव्हा खूप चांगलं वाटलं. '
संबंधित बातम्या
Gadar 2 : तारा सिंह आणि सकिनाची जोडी पुन्हा येतेय, शूटिंगचे फोटो व्हायरल