Gadar 2 : तारा सिंह आणि सकिनाची जोडी पुन्हा येतेय, शूटिंगचे फोटो व्हायरल
Gadar-2 : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा 2001 मध्ये प्रदर्शित झालेला 'गदर' हा चित्रपट लोक आजही आवडीने पाहतात.
Gadar-2 : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) 2001 मध्ये प्रदर्शित झालेला 'गदर' हा चित्रपट लोक आजही आवडीने पाहतात. या चित्रपटातील आयकॉनिक 'हँड पंम्प' सिन लोक आवर्जून पाहतात. या चित्रपटात सनी देओलसोबत अभिनेत्री अमिषा पटेलने (Ameesha Patel) देखील प्रमुख भूमिका साकारली होती. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'गदर-2' (Gadar-2) च्या शूटिंगला सुरूवात झाली असून अमिषा पटेलने या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा फोटो शेअर केला आहे.
ट्रेड अॅनॅलिस्ट तरण आदर्शने देखील गदर -2 चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा सनी देओल यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमधील सनीच्या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. या चित्रपटात सकिना ही भूमिका अमिषा पटेल तर तारा सिंग ही भूमिका सनी देओल साकारणार आहेत. गदर -2 चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी केले आहे. गदर या चित्रपट 19 कोटी रूपये खर्च करून तयार करण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकरांची विशेष पसंती मिळाली. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 133 कोटींची कमाई केली. त्यामुळे गदर-2 चित्रपटाची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
या चित्रपटांचे सिक्वेल येणार प्रेक्षकांच्या भेटीस
गदर-2 प्रमाणेच लवकरच हंगामा, टायगर, ओह माय गॉड आणि मर्दानी या चित्रपटांचे सिक्वेल देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
संबंधित बातम्या