(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Video : अखेर समोर आलंच! अभिषेक-ऐश्वर्याने एकत्रच साजरा केला होता आराध्याचा वाढदिवस, 'त्या' व्हिडीओमुळे चर्चांना पूर्णविराम
Video : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी एकत्रच आराध्याचा वाढदिवस साजरा केला असल्याचं सत्य समोर आलेलं आहे.
Abhishek Bachchan-Aishwarya Rai Bachchan : काहीच दिवसांपूर्वी अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या बच्चनची (Aishwarya Rai Bachchan) लेक आराध्या बच्चन हिचा 13 वा वाढदिवस साजरा झाला. पण या वाढदिवसाला अभिषेक बच्चन हजर नसल्याचं म्हटलं जात होतं. पण नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओमुळे अभिषेक आराध्याच्या वाढदिवसाला हजर होता हे सत्य अखेरीस समोर आलेलं आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ नुकताच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेकही आराध्याच्या वाढदिवसाला हजर होता, असं पाहायला मिळतंय. आराध्याची बर्थडे पार्टी आयोजित करणाऱ्य आयोजकांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याने त्या आयोजकांचे आभार मानले आहेत. या व्हिडीओमुळे अभिषेक आराध्याच्या बर्थडेसाठी हजर होता, हे समोर आलंंय. त्यामुळे आता त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असल्याचं पाहायला मिळतंय.
ऐश्वर्या अभिषेकने शेअर केला व्हिडीओ
आराध्याच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित केल्याबद्दल अभिषेक आणि ऐश्वर्याने आयोजकांचे आभार मानले होते. मात्र, दोघांनीही वेगवेगळे व्हिडीओ केले होते. हे व्हिडीओ आयोजकांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मागील 13 वर्षांपासून हे आयोजक आराध्याच्या बर्थडे पार्टीचं आयोजन करत आहेत.
ऐश्वर्या अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या
बॉलिवूडचं (Bollywood) मोस्ट फेवरेट कपल ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि अभिषेक (Abhishekh Bachchan) सध्या घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहे. दोघांनीही अद्याप याबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. पण, कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमात किंवा एखाद्या इव्हेंटमध्ये दोघेही एकत्र दिसत नाहीत. अशातच ऐश्वर्या आणि अभिषेक दोघांच्या नात्याचं काय झालं? याबाबत इंडस्ट्रीसह चाहत्यांनाही उत्सुकता लागली आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
Aai Kuthe Kay Karte : आई कुठे काय करते मालिकेचं दुसरं पर्व येणार? अरुंधती फेम अभिनेत्री म्हणाली...