एक्स्प्लोर
होय मी डेटिंग करतेय, आमीर खानची कन्या इराची कबुली
अभिनेता आमीर खानची मुलगी इराने इन्स्टाग्रामवरुन मिशालला डेट करत असल्याचं कबूल केलं आहे.
मुंबई : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमीर खानची कन्या इरा हिने आपण डेटिंग करत असल्याचं जाहीर केलं आहे. गेले अनेक दिवस तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये दिसणारा मिशाल कृपलानी तिचा बॉयफ्रेण्ड आहे. 'आस्क मी एनिथिंग'ला उत्तर देताना इराने मिशालला डेट करत असल्याचं कबूल केलं.
सोशल मीडियावरील फोटोंमुळे इरा अनेकदा चर्चेचा विषय ठरत असते. इराने काही महिन्यांपूर्वी मिशालसोबत फोटो शेअर केल्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. चाहत्यांनी संबोधलेला 'मिस्ट्री मॅन' इराचा बॉयफ्रेण्ड आहे का, असा प्रश्न अनेक जणांनी कमेंटच्या स्वरुपात विचारला होता.
इराने त्यावेळी इन्स्टाग्रामवर तीन फोटो पोस्ट केले होते. कॅलिफोर्नियातील सांता बार्बरामधले हे फोटो होते. 'तुमची सुट्टी मिशालसारखीच हसरी गेली असेल, अशी आशा.' असं कॅप्शन देताना तिने तीन बदामही जोडले होते. दुसऱ्या फोटोत तर मिशाल इराच्या कपाळावर किस करताना दिसला होता.
आमीर खानची मुलगी इरासोबत दिसणारा हा तरुण कोण?
कोण आहे मिशाल कृपलानी?
मिशाल एक नवोदित कलाकार आहे. तो संगीतकार म्हणून नावारुपास येत आहे. मिशालने आपल्या काही कलाकृती इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्या आहेत.
शॉर्ट्स घातल्याने आमीरची मुलगी इरा पुन्हा ट्रोल
22 वर्षांची इरा आणि आमीर आणि रिना खान यांची मुलगी. इराला चित्रपट निर्मितीमध्ये रस असल्याचं आमीरने सांगितलं होतं. सध्या तिचं शिक्षण सुरु आहे. यापूर्वी कमी कपडे घालून सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्याबद्दल इराला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आमीर खानसोबतच्या एका फोटोमुळेही तिला समाजात टीकेची धनी व्हावं लागलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement