एक्स्प्लोर
म्हणून '2.0' मधील रजनीच्या भूमिकेची ऑफर आमीरने नाकारली
दिग्दर्शक शंकर यांनी आमीरला रजनीकांत साकारत असलेली भूमिका ऑफर केली होती. रजनीकांत यांनी स्वतः फोन करुन आमीरला हा चित्रपट करण्यास सांगितलं
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतची मुख्य भूमिका असलेला '2.0' हा चित्रपट मि. परफेक्शनिस्ट आमीर खानला ऑफर झाला होता. खुद्द रजनीनेच ही भूमिका करण्यास सुचवल्याचं आमीरने एका मुलाखतीत सांगितलं.
रजनीकांत-ऐश्वर्याच्या 'रोबो' चित्रपटाचा सिक्वल असलेल्या '2.0' या चित्रपटात रजनीसोबत अक्षयकुमार खलनायकाच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. फक्त भारतच नव्हे, तर आशियातील सर्वाधिक बजेट असलेल्या या चित्रपटाचा आमीर एक भाग होऊ शकला असता, मात्र त्याने ही भूमिका नाकारली.
दिग्दर्शक शंकर यांनी आमीरला रजनीकांत साकारत असलेली भूमिका ऑफर केली होती. रजनीकांत यांनी स्वतः फोन करुन आमीरला हा चित्रपट करण्यास सांगितलं. मात्र या भूमिकेसाठी 'थलैवा' रजनीकांतच योग्य असल्याचं आपल्याला वाटतं, असं नम्रपणे सांगत आमीरने हा रोल नाकारला.
'या चित्रपटाची स्क्रीप्ट उत्तम आहे आणि हा सिनेमा सुपरहिट होईल, यात शंका नाही. मात्र जेव्हा जेव्हा मी डोळे बंद करतो, तेव्हा तेव्हा रजनी सरच या भूमिकेसाठी माझ्या डोळ्यासमोर येतात.' असं आमीर खानने मुलाखतीत सांगितलं.
'मी ही भूमिका करु शकत नसल्याचं शंकर यांना सांगितलं. फक्त रजनी सरच ही भूमिका करु शकतात. त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही' असं आमीरने प्रांजळपणे सांगितलं.
2.0 हा सिनेमा 25 जानेवारी 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे. अक्षयचा हा पहिलाच तामिळ प्रोजेक्ट असून पहिल्यांदाच तो खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
https://twitter.com/RajiniFC/status/921042154700582913
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement