एक्स्प्लोर

Aamir Khan Celebrates Birthday :  'मिस्टर परफेक्शनिस्ट'चं 60 व्या वर्षात पदार्पण; चाहत्यांकडे मागितलं 'हे' गिफ्ट

Aamir Khan Celebrates Birthday :  आमिरने आपला वाढदिवसाचे सेलिब्रेशन आपल्या ऑफिसमध्ये 'लापता लेडिज' चित्रपटाच्या टीमसोबत केले. यावेळी दिग्दर्शिका आणि आमिरची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावदेखील उपस्थित होती.

Aamir Khan Celebrates Birthday :  बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानने (Aamir Khan) आज 60 व्या वर्षात पदार्पण केले. आमिर खानने आपला वाढदिवसाचे सेलिब्रेशन (Aamir Khan Celebrates Birthday) आपल्या ऑफिसमध्ये 'लापता लेडिज' चित्रपटाच्या टीमसोबत केले. यावेळी दिग्दर्शिका आणि आमिरची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावदेखील उपस्थित होती. 

आमिर खानने यावेळी लापता लेडिज चित्रपटाची टीम आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी आमिरसोबत त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव आणि त्यांच्या चित्रपटाची टीम उपस्थित होती.'बर्थ डे बॉय' आमिर खान यावेळी हँडसम दिसला. त्याने ब्लॅक टी शर्ट आणि ब्लू डेनिम जीन्स परिधान केली होती. आमिरची पूर्वाश्रमीची पत्नी आणि दिग्दर्शिका किरण रावदेखील स्टायलिश दिसत होती. किरणने मल्टिकलर वनपीस ड्रेस परिधान केला होता.केक कापल्यानंतर किरण रावने आमिरला केक भरवत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Snehkumar Zala (@snehzala)

आमिरला  हवंय वाढदिवसाचं गिफ्ट... 

 वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या 'लापता लेडीज' चित्रपटाच्या टीमचे आमिर खानने कौतुक केले. हा मानवी नातेसंबंधांवर आधारित उत्कृष्ट चित्रपट असल्याचे आमिरने म्हटले. यावेळी आमिर खान म्हणाला की, तुमच्यापैकी कोणाला मला गिफ्ट द्यायचे असेल तर त्याने लापता लेडीज चित्रपटाचे तिकीट विकत घ्यावे आणि हा चित्रपट पाहावा, हेच माझे गिफ्ट असेल, असेही आमिरने म्हटले. 

आमिर खानने बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. 'कयामत से कयामत तक', 'दिल','राजा हिंदुस्तानी', बाझी, गुलाम, मन, सरफरोश, लगान, दिल चाहता है, रंग दे बसंती आदी चित्रपटांमधील भूमिकेचे त्याचे कौतुक झाले. आमिर खान वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आमिरच्या चित्रपटात वेगवेगळे विषय हाताळले जात असल्याने चाहत्यांना त्याच्या चित्रपटांची उत्सुकता असते.

बॉक्स ऑफिसवर कमाई 

लापता लेडिज हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. सुरुवातीला कमाईच्या बाबतीत धीमा असलेल्या चित्रपटाने आता वेग पकडला आहे. मागील 13 दिवसांमध्ये चित्रपटाने 9.79 कोटींची कमाई केली आहे. 

 इतर संबधित बातमी: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget