Aamir Khan Instagram Live Session : ड्रग्ज घेणं कधी बंद करणार, इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये चाहत्याच्या प्रश्नावर आमिर काय म्हणाला? पाहा व्हिडीओ
Aamir Khan Instagram Live Session : आमिर खान चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी गुरुवारी त्याच्या प्रॉडक्शन हाऊसच्या सोशल मीडिया हँडलवर लाईव्ह आला होता. यामध्ये तो कॅमेऱ्यात पाईप ओढतानाही दिसला. त्यावर आमिरला एका तिरकस प्रश्नही केला.
चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी गुरुवारी त्याच्या प्रॉडक्शन हाऊसच्या सोशल मीडिया हँडलवर लाईव्ह आला होता. यामध्ये तो कॅमेऱ्यात पाईप ओढतानाही दिसला. त्यावर चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आले. एका चाहत्याने थेट आमिरलाच सवाल केला. चाहत्याने तू ड्रग्ज घेतलंय का असा प्रश्नच आमिरला केला.
ड्रग्ज घेणं बंद कर, आमिरने म्हटले, काय यार...
लाईव्ह सेशन दरम्यान एका युजरने 'तुम्ही ड्रग्ज घेत आहात, ड्रग्ज घेणे बंद करा'असे आमिरला म्हटले. आमिरने चाहत्याचे हे म्हणणे वाचताच याला धक्काच बसला. मात्र, त्याने संयम बाळगत, शांतपणे 'काय म्हणतोस यार?' असे म्हटले.
अंबानींच्या पार्टीत का नाचला?
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाला आमिर खानने हजेरी लावली होती. या पार्टीत तो थिरकताना दिसला. त्यावर लाईव्ह दरम्यान एका युजरने प्रश्न केला. स्वत:च्या मुलीच्या लग्नात नाचला नाहीस आणि जामनगरमध्ये अंबानींकडे नाचलास असे विचारले. त्याला उत्तर देताना आमिरने म्हटले की, मी माझ्या मुलीच्या लग्नात नाचलो. अनंत अंबानींच्या मुलाच्या कार्यक्रमात नाचलो असे त्याने म्हटले. मुकेश अंबानी हे माझे जवळचे मित्र आहेत. मुकेश, नीता आणि त्यांची मुले हे माझ्यासाठी कुटुंबासारखे आहेत. मी त्यांच्या घरी लग्नात नाचतो आणि ते माझ्या कौटुंबिक कार्यक्रमातही सहभागी होतात, असेही आमिरने सांगितले. आमिर खानने 14 मार्च रोजी वाढदिवसाच्या दिनी लाईव्ह येऊ असे म्हटले.
पाहा व्हिडीओ : आमिर खान इन्स्टाग्राम व्हिडीओ