एक्स्प्लोर
धोकादायक गोलंदाज कोण? आमीरच्या प्रश्नावर कोहलीचं उत्तर..
आमीर खान आणि विराट कोहली यांनी आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक बाबींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.
मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार आमीर खान आणि टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार विराट कोहली यांनी झी टीव्हीवरील एका चॅट शोमध्ये गप्पा मारल्या.
यावेळी दोघांनी आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक बाबींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. आमीरने अनुष्कापासून ते क्रिकेटमधील सर्वात आवडती खेळी अशा विविध मुद्द्यांवर विराटला बोलतं केलं.
तर विराटनेही आमीर खानबद्दल उत्सुकता वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं खुद्ध आमीरकडून काढून घेतली.
आमीरचा प्रश्न: तुझ्या बॅटिंगला आव्हान देणारा जगातील सर्वोत्तम गोलंदाज कोण?
विराटचं उत्तर : सध्याच्या काळात बोलायचं झालं, तर पाकिस्तानचा मोहम्मद आमीर हा एक चांगला गोलंदाज आहे. जगात सध्या टॉपचे जेव्हढे गोलंदाज आहेत, त्यात आमीरचं नाव घ्यावं लागेल. आमीरच्या गोलंदाजीवर फलंदाजी करताना, तुम्हाला सावध राहून, लक्ष विचलित होऊ न देता फलंदाजी करावी लागते.
दरम्यान, यापूर्वी आशिया चषक 2016 मध्ये विराटने आमीरचं कौतुक केलं होतं. आमीर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, ते लाजवाब आहे असं कोहली त्यावेळी म्हणाला होता.
मोहम्मद आमीरनेच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये विराट कोहलीची विकेट घेऊन, भारताचा महत्त्वाचा अडथळ दूर केला होता. आमीरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने चॅम्पियन्स चषक आपल्या नावे केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement