'असला हिरो असतो का?..', 1993 साली आलेला सिनेमा, रिलीज होण्यापूर्वी महाफ्लॉप म्हणून झिडकारलं
bollywood : 1993 साली अभिनेता शाहरुख खानचा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, रिलीज होण्यापूर्वीच प्रचंड फ्लॉप म्हणून घोषित करण्यात आला होता.

bollywood : बॉलिवूडचा किंगखान शाहरुखने 1992 मध्ये आलेल्या ‘दीवाना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. पहिल्याच चित्रपटातून शाहरुख लोकांच्या मनात घर करून गेला. त्यानंतर 1993 हे वर्ष शाहरुखच्या कारकिर्दीसाठी खूपच भाग्यवान ठरले. कारण, 1993 मध्ये शाहरुख खानचे दोन चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या पाच चित्रपटांमध्ये सामील झाले. त्यापैकी एक होता ‘डर’, जो 1993 मधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. तर दुसरा चित्रपट होता ‘बाजीगर’, जो त्या वर्षातील चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.
आज आम्ही तुम्हाला शाहरुखच्या ‘बाजीगर’ चित्रपटाबाबत काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या ऐकून तुम्हीही चकित व्हाल. या चित्रपटात महत्त्वाची भूमिका करणारे, म्हणजेच लीड खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप ताहिल यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता की, ‘बाजीगर’ला रिलीज होण्यापूर्वीच लोकांनी महा फ्लॉप ठरवले होते. त्यांनी सांगितले होते की, जेव्हा चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, तेव्हा प्रोड्युसर्सची अवस्था बिकट झाली होती. कारण, जेव्हा शाहरुख शिल्पा शेट्टीला छतावरून खाली फेकून तिची हत्या करतो तो सीन शूट होत होता, तेव्हा तिथे उपस्थित असलेले सगळेच म्हणत होते – “हा कसला हिरो आहे यार, सांग बरं, हिरोईनची हत्या करतोय. हा चित्रपट चालणारच नाही.”
दिलीप ताहिल म्हणाले की, सेटवर अशा- अशा गोष्टी ऐकून डिस्ट्रीब्युटर्स आणि प्रोड्युसर्स हैराण झाले होते. पण दुसरीकडे शाहरुखला पूर्ण विश्वास होता की हा चित्रपट नक्कीच कमाल करेल. आणि तसंच झालं. चित्रपटगृहांमध्ये रिलीज होताच ‘बाजीगर’ ब्लॉकबस्टर ठरला. प्रेक्षकांनी या चित्रपटावर मनापासून प्रेमाचा वर्षाव केला.
सांगायचे झाले तर, ‘बाजीगर’ हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट होता, ज्याचे दिग्दर्शन अब्बास-मस्तान यांनी केले होते आणि निर्मिती वीनस मूव्हीजने केली होती. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल, शिल्पा शेट्टी, दिलीप ताहिल आणि राखी यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. चित्रपटाचे संगीत अनु मलिक यांनी दिले होते.
हा चित्रपट अशा एका तरुणाची कथा होती, जो आपल्या कुटुंबाच्या विनाशाचा बदला घेण्यासाठी भयंकर रूप धारण करतो. ही कथा इरा लेविन यांच्या 1953 मध्ये प्रकाशित A Kiss Before Dying या कादंबरीवर आणि 1991 मध्ये त्याच नावाने बनलेल्या चित्रपटावर आधारित होती. मीडिया रिपोर्टनुसार, ‘बाजीगर’ बनवण्यासाठी निर्मात्यांनी अंदाजे 3 कोटी रुपये खर्च केले होते. तर या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर जवळपास 15 कोटींची कमाई केली. या चित्रपटानंतर शाहरुखच्या कारकिर्दीला नवीन उंची मिळाली. हा चित्रपट आजही लोकांमध्ये लोकप्रिय आहे. तसेच, या चित्रपटातील सर्व गाणी सुपरहिट ठरली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Marathi Actor Dada Kondke Death Story: '...मी मांडीवर दादांचं प्रेत घेऊन गेले'; दादा कोंडकेंच्या निधनानंतर ॲम्ब्युलन्सही मिळाली नव्हती, काय घडलेलं? लेखिकेनं स्पष्ट सांगितलं























