Ulajh : जान्हवी कपूरचा 'उलझ' येणार प्रेक्षकांच्या भेटीला; लवकरच होणार शूटिंगला सुरुवात
Janhvi Kapoor : जान्हवी कपूरचा 'उलझ' (Ulajh) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![Ulajh : जान्हवी कपूरचा 'उलझ' येणार प्रेक्षकांच्या भेटीला; लवकरच होणार शूटिंगला सुरुवात Janhvi Kapoor Ulajh new movie know actress latest update Ulajh : जान्हवी कपूरचा 'उलझ' येणार प्रेक्षकांच्या भेटीला; लवकरच होणार शूटिंगला सुरुवात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/10/3583041d56a644fed55895fd80f6c1e81683716281565254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Janhvi Kapoor In Movie Ulajh : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचे (Janhvi Kapoor) सिनेमे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडले आहेत. त्यामुळे तिच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. जान्हवीचा 'उलझ' (Ulajh) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
जान्हवी कपूर सध्या 'उलझ' (Ulajh) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात जान्हवीसह गुलशन देलैया आणि रोशन मैथ्यू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर सुधांशू सरिया या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट समोर आलेली नाही. 'उलझ' या सिनेमासोबत जान्हवी जोडली गेल्याने तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.
'उलझ' या सिनेमात राजेश तैलंग, मियांग चांग, सचिन खेडेकर, राजेंद्र गुप्ता आणि जितेंद्र जोशी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा सिनेमा देशभक्तीवर आधारित आहे. या महिन्याच्या शेवटी या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. या सिनेमात जान्हवी एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे.
'उलझ' या सिनेमाबद्दल बोलताना जान्हवी कपूर म्हणाली,"उलझ' या सिनेमाची संहिता वाचल्यानंतर लगेचच मी या सिनेमासाठी होकार दिला. या सिनेमाच्या कथाकनाकाने मला आकर्षित केलं. चौकटीबाहेरचं काम करायला मला आवडतं आणि 'उलझ' या सिनेमाने मला ती संधी दिली आहे.
View this post on Instagram
जान्हवी पुढे म्हणाली,"उलझ' या सिनेमातील माझं पात्र थोडं वेगळं आहे. या सिनेमात विविधता आहे. वेगवेगळे जॉनर असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन करेल. या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा हा सिनेमा आहे. त्यामुळे आता या सिनेमाच्या शूटिंगसाठी मी उत्सुक आहे".
जान्हवी कपूरचे आगामी सिनेमे (Janhvi Kapoor Upcoming Movies)
'उलझ' (Ulajh) या सिनेमासह जान्हवीचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जान्हवी ज्यूनिअर एनटीआरच्या (Jr NTR) 'एनटीआर 30' (NTR 30) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमासह वरुण धवनच्या 'बवाल' या सिनेमासोबतदेखील जान्हवीचं नाव जोडलं गेलं आहे. आता तिच्या 'उलझ' या सिनेमाचीदेखील चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या
NTR 30: ज्युनिअर एनटीआर आणि जाह्नवी कपूर यांच्या 'एनटीआर 30' मध्ये 'या' अभिनेत्याची एन्ट्री; चित्रपटाच्या सेटवरील फोटो व्हायरल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)