Singham Again : 'सिंघम अगेन'मध्ये दीपिका पदुकोण दिसणार 'लेडी सिंघम'च्या भूमिकेत; दिग्दर्शक रोहित शेट्टीने दिली माहिती
Singham Again : रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये दीपिका पदुकोण लेडी कॉपच्या भूमिकेत दिसणार आहे.
Singham Again : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) पहिल्यांदाच एका चित्रपटात लेडी सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) हा चित्रपट बनवणार असून या चित्रपटाचे नाव 'सिंघम अगेन' (Singham Again) असे असणार आहे. रोहित शेट्टीने यापूर्वी दीपिका पदुकोणबरोबर 2013 साली प्रदर्शित झालेल्या 'चेन्नई एक्स्प्रेस' (Chennai Express) या चित्रपटात काम केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण 'सिंघम अगेन'मध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे आणि दीपिका पदुकोण कॉप युनिव्हर्समध्ये लेडी कॉपच्या भूमिकेत येणार आहे. दीपिका पदुकोणबरोबर 'सिंघम अगेन'मध्ये काम करणार अशी माहिती स्वत: रोहित शेट्टीने आज मुंबईत त्याच्या आगामी 'सर्कस' (Cirkus) या चित्रपटातील 'करंट लगा रे' या गाण्याच्या लाँचच्या वेळी केली.
दीपिका बरोबर पुन्हा काम करण्याबाबत रोहित शेट्टी म्हणाला...
दीपिका पदुकोणबरोबर पुन्हा काम करण्याबाबत रोहित शेट्टी म्हणाला, "सगळ्यांना माहीत आहे की मी दिग्दर्शित केलेल्या आगामी चित्रपटाचे नाव 'सिंघम अगेन' आहे. मी कधीही लेडी सिंघमची ओळख करून दिली नाही. त्यामुळे आज मी तुम्हाला सांगतो की दीपिका पदुकोण 'सिंघम अगेन'मध्ये लेडी सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. दीपिका माझ्या कॉप युनिव्हर्सची बॉम्बशेल आहे. आम्ही पुढच्या वर्षी या चित्रपटावर काम सुरू करू." रोहित शेट्टीने दीपिकाबरोबर 'सिंघम अगेन'मध्ये काम करण्याची घोषणा करताच दीपिकाने रोहित शेट्टीला स्टेजवर मिठी मारली आणि धन्यवाद म्हटले.
दीपिका पदुकोण काय म्हणाली?
दीपिका पदुकोण या प्रोजेक्टबद्दल खूप उत्सुक आहे. नवीन प्रोजेक्टबद्दल सांगताना दीपिका म्हणाली, "रोहित शेट्टीच्या चेन्नई एक्स्प्रेस या चित्रपटाने मला एक लोकप्रिय व्यक्तिरेखा दिली. मला नेहमीच त्याच्याबरोबर काम करण्याची इच्छा होती." चेन्नई एक्सप्रेसनंतर रोहित शेट्टी आणि दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा या चित्रपटात काम करणार आहेत. चेन्नई एक्सप्रेसने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.
23 डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या 'सर्कस' चित्रपटातील 'करंट लगा रहे' या गाण्यात रणवीर आणि दीपिका एकत्र नाचताना दिसणार आहेत. या गाण्याच्या लाँचिंगला रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण दोघेही उपस्थित होते. गाण्याच्या लॉन्च प्रसंगी रणवीर आणि दीपिकाने 'करंट लगा रे' या गाण्याचं वैशिष्ट्य सांगण्याबरोबरच या गाण्यावर जोरदार डान्सही केला आणि खूप धम्माल केली.
महत्त्वाच्या बातम्या :
Sigham Again: अजय देवगणच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'सिंगम अगेन' येणार प्रेक्षकांच्या भेटीस