एक्स्प्लोर

Bollywood Actor Divorced Due To The Dogs: आमदाराच्या हिरो मुलाची विचित्र प्रेमकहाणी; परदेशी सौंदर्यवतीच्या प्रेमात पडून बांधली लग्नगाठ, पण अखेर कुत्र्यांमुळे घटस्फोट

Bollywood Actor Divorced Due To The Dogs: ना अफेअर, ना कुटुंबाची कटकट, तर बॉलिवूड अभिनेत्याचा चक्क त्याच्या पाळीव कुत्र्यांमुळे घटस्फोट झाला आहे.

Bollywood Actor Divorced Due To The Dogs: सध्या फिल्म इंडस्ट्रीत (Film Industry) आपण सेलिब्रिटी जोडप्यांचे (Celebrity Couple) घटस्फोट (Divorced) होत असल्याचं पाहात आहोत. एका पाठोपाठ एक सेलिब्रिटी जोडपी स्वतःला लग्नाच्या बंधनातून मुक्त करत असल्याचं पाहायला मिळतंय. सेलिब्रिटी जोडप्यांबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. त्यांची लव्हस्टोरी, ते एकमेकांना कसे भेटले? वैगरे वैगरे... पण, त्याच जोडप्याचा ज्यावेळी घटस्फोट होतो, त्यावेळी चर्चा आणखी रंगतात. बऱ्याचदा दोघांमधील वाढलेलं अंतर, व्यस्तता किंवा दोघांमध्ये तिसऱ्या व्यक्तीचं झालेलं आगमन यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. 

बऱ्याचदा असं दिसून आलं आहे की, कुटुंबातील सदस्यांचे निर्बंध, वेगवेगळ्या आवडीनिवडी देखील जोडप्याला वेगळं करतात, पण काही कथा इतक्या विचित्र असतात की, त्या लोकांना आश्चर्यचकित करतात. असाच एक अनोखा आणि आश्चर्यकारक प्रकार बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) अरुणोदय सिंहच्या (Arunoday Singh) आयुष्यात झाला आहे. अभिनेत्यानं एका परदेशी महिलेशी लग्न केलं, पण चक्क कुत्र्यांमुळे त्यांचं नातं तुटलं. 

गोव्यात भेट, प्रेम आणि लग्न

'अपहरण', 'जिस्म 2' आणि 'ब्लॅकमेल' सारख्या चित्रपटांमधून चर्चेत आलेल्या अभिनेता अरुणोदय सिंहनं अभिनयाच्या जगात स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे. त्याचा गंभीर अभिनय आणि उत्तम कॉमिक टायमिंगची प्रेक्षकांनी प्रशंसा केली. अभिनेत्याच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच त्याचं वैयक्तिक आयुष्यही खूप मनोरंजक आहे. अरुणोदय गोव्याच्या प्रवासादरम्यान कॅनेडियन ली एल्टनला भेटला आणि तिथेच तिच्या प्रेमात आकंठ बुडाला. दोघांनी जवळजवळ तीन वर्ष एकमेकांना डेट केलं आणि नंतर 2016 मध्ये लग्न केलं. दोघांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला, ज्यामध्ये अरुणोदय याचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. अभिनेत्याचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं, लग्नसमारंभात सेलिब्रिटींसोबतच अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.  

घटस्फोटाचं विचित्र कारणं

ली ही व्यवसायानं योगा प्रशिक्षक होती आणि जीवनशैलीकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन खूपच वेगळा होता. लग्नानंतर लगेचच दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. आणि हा दुरावा कोणत्याही विवाहबाह्य संबंधांमुळे किंवा इतर कोणत्याही व्यक्तीमुळे नव्हता, तर चक्क कुत्र्यांमुळे होता. हो, अरुणोदय सिंहचं कुत्र्‍यांवर अफाच प्रेम. त्याच्या पाळीव प्राण्यांचे फोटो आणि व्हिडीओ तो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असतो. पण त्यांची पत्नी ली यांना अरुणोदयच्या कुत्र्यांबद्दल, विशेषतः त्यांच्या भुंकण्याबद्दल आणि आपापसांत भांडण्याबद्दल तक्रार होती. हळूहळू कुत्र्यांचं भुंकणं आणि आपापसांत खेळणं हे त्या दोघांच्या नात्यात कटुतेचं कारण बनलं. या मुद्द्यावर दोघांमध्ये खटके उडू लागले, दररोज वाद होऊ लागले, ज्याचं रुपांतर नंतर संघर्ष आणि तणावात झालं. दोघांनी प्रयत्न केले, पण जेव्हा तोडगा निघाला नाही तेव्हा 2019 मध्ये घटस्फोटाचा निर्णय घेण्यात आला. अरुणोदयनं आपल्या कुत्र्‍यांना दूर लोटण्याऐवजी पत्नीपासून वेगळं होण्याचा मार्ग निवडला.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hindustan Times Brunch (@htbrunch)

तारा सुतारियाशी जोडलं नाव 

त्यांच्या घटस्फोटाला सहा वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. गेल्या वर्षी, अभिनेत्याचं नाव तारा सुतारियाशी जोडलं गेलेलं, पण तारा किंवा अरुणोदय दोघांनीही या अफवांवर प्रतिक्रिया दिली नाही. दोघेही डिनर डेट आणि आउटिंगवर एकत्र दिसले. दोघांमधील वयाच्या फरकाबद्दल चर्चा होती. अरुणोदय 41 वर्षांचा आहे, तर तारा फक्त  28 वर्षांची आहे. सध्या तारा सुतारिया वीर पहाडियाला डेट करतेय. तिनं सोशल मीडियावरही वीरसोबतच्या नात्याची कबुली दिली आहे. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट होतात. दोघेही एकत्र वेकेशनवरही गेले होते. 

अरुणोदयचं राजकीय कुटुंबाशी कनेक्शन 

अरुणोदय केवळ अभिनेताच नाही तर एका राजकीय कुटुंबातून देखील येतो. तो मध्य प्रदेशचे ज्येष्ठ नेते अजय अर्जुन सिंह उर्फ ​​राहुल भैया यांचा मुलगा आहे. त्याचे आजोबा अर्जुन सिंह 1980 च्या दशकात दोनदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्याचे वडील देखील कॅबिनेट मंत्री राहिले आहेत आणि सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 

दरम्यान, अरुणोदयच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, 2009 मध्ये 'सिकंदर' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तो 'आयशा', 'ये साली जिंदगी', 'जिस्म 2', 'मैं तेरा हिरो', 'उंगली', 'लव्ह पर स्क्वेअर फूट' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला. तो वेब सीरिजच्या जगातही सक्रिय आहे. 'अपहरण', 'काली काली आँखें' आणि 'लाहोर कॉन्फिडेंशियल' सारख्या सीरिजमध्ये त्यानं आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

IIT Graduate Became Monster In Horror Movie: भयानक चेहऱ्यामुळे हॉरर फिल्म्सचा राक्षस बनला 'हा' IIT ग्रॅज्युएट; ओबडधोबड चेहरा, विचित्र उंचीमुळे बॉलिवूडमधून केलेलं बेदखल, ओळखता का कोण?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Ajit Pawar : राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या कशासाठी? अजित पवारांनी विधानसभेत समजावून सांगितलं
राज्याची आर्थिक शिस्त बिघडलेली नाही, 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांबाबत अजित पवारांंचं स्पष्टीकरण
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Embed widget